Headlines

आषाढी वारी:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या, नाना‎पटोले आजपासून पंढरपुरात‎




राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आषाढी यात्रेच्या तयारीची पाहणी आणि आढावा घेण्यासाठी रविवार ( दि. १९) रोजी पंढरपूर दौऱ्यावर येणार आहेत. गेल्या ५ वर्षांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आषाढी यात्रेपूर्वी पंढरपुरात येऊन यात्रेच्या नियोजनाची पाहणी करतात आणि आढावा बैठक घेतात. येत्या २५ जुलै रोजी आषाढी एकादशीचा सोहळा संपन्न होत आहे. पार्श्वभूमीवर पंढरपूर येथील पूर्वतयारी, पाहणी आणि प्रशासकीय उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवार आहेत. अकलूज । विधानसभेचे माजी अध्यक्ष नाना पटोले हे आज सोलापूर दौऱ्यावर येत असून, ते संत तुकाराम महाराज व ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. पटोले हे आज १८ जुलै रोजी रात्री सोलापूर येथे येणार असून उद्या १९ जुलै रोजी तुळजापूर, अक्कलकोट आणि गाणगापूर येथे देवदर्शन घेतील. त्यानंतर २० जुलै रोजी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर ते सराटी ते अकलूज पायी चालणार आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *