![]()
लग्नाची पंगत तसेच गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी अथवा रमजानसारख्या सण-उत्सवांत होणारे महाप्रसाद, लंगर, अन्नछत्र किंवा इफ्तार मेजवानीतून भाविकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळावे, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) देशात पहिल्यांदाच महाराष्ट्रात अत्यं
.
त्यानुसार राज्यात कोणत्याही प्रकारच्या सामूहिक अन्नवाटप करताना किमान ७ दिवस अगोदर स्थानिक अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांकडे (पदनिर्देशित अधिकारी) विहित नमुन्यात पूर्वसूचना देऊन परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंनी वेळोवेळी स्वतंत्र आदेश काढण्याची पद्धत बंद करून, देशात पहिल्यांदाच ‘सण-उत्सव अंमलबजावणी मार्गदर्शिका’ कायमस्वरूपी लागू केली आहे.
न्यायालयाच्या निर्देशानुसार अन्न विषबाधा रोखण्यासाठी आणि नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी हे ठोस पाऊल उचलण्यात आले आहे.
सणांचे त्रिस्तरीय वर्गीकरण
प्रशासनाने सणांची व्याप्ती व जोखीम लक्षात घेऊन त्रिस्तरीय रचना केली आहे:
- स्तर-१ (राज्यव्यापी) : गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, ईद-उल-फित्र, ईद-उल-अजहा तसेच नाताळ व नववर्ष पूर्वसंध्या.
- स्तर-२ (प्रादेशिक) : महाशिवरात्र, होळी, पंढरपूर वारी, श्रावण मास, दहीहंडी, दसरा व कोजागिरी पौर्णिमा.
- स्तर-३ (स्थानिक) : ग्रामदैवत यात्रा, जत्रा, उरूस व पालखी सोहळे यासाठी सणापूर्वी २१ दिवसांपासून ते सणानंतर ३० दिवसांपर्यंत प्रमाणित अंमलबजावणी चक्र राबवले जाईल. या काळात संशयास्पद साहित्याची पहाटेच्या सुमारास नाकाबंदी, शीतगृहे व घाऊक बाजारांची तपासणी आणि थेट घटनास्थळी चाचणी करण्यासाठी रस्त्यांवर ‘फूड सेफ्टी ऑन व्हील्स’ या फिरत्या प्रयोगशाळा तैनात राहतील.
एफडीएला आठवडाभर आधी कळवा- तुकाराम मुंढे
महाप्रसाद, भंडारा, लंगर, इफ्तार मेजवानी किंवा अन्नछत्रासह सर्व सामूहिक भोजनाचे आयोजन करताना आयोजकांनी किमान आठवडाभर आधी अन्न व औषध प्रशासनाला विहित प्रपत्रात माहिती देणे अनिवार्य आहे. यामुळे प्रत्यक्ष कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी आमचे अधिकारी घटनास्थळी जाऊन स्वयंपाकाची जागा, पाणी, स्वच्छता आणि अन्न सुरक्षेच्या उपाययोजनांची प्रत्यक्ष तपासणी करू शकतील. अन्नाचा दर्जा राखणे आणि अन्न विषबाधेचा धोका मुळापासून संपवणे हाच यामागील मुख्य उद्देश आहे, असे तुकाराम मुंढे यांनी सांगितले.
सणासुदीत ग्राहकांनी घ्यावयाची खबरदारी अशी
- मिठाई खरेदी : दुकानाच्या दर्शनी भागात ‘फूड सेफ्टी कनेक्ट’ ॲपचा क्यूआर कोड व अधिकृत परवाना क्रमांक लावला आहे का. मिठाईवरील वर्ख शुद्ध चांदीचाच आहे का, हे तपासा. अन्नपदार्थ वर्तमानपत्रात किंवा शाईच्या कागदात बांधून घेऊ नका. उपवासाचे साहित्य : भगर (वरई), साबुदाणा, राजगिऱ्यावरील पॅकिंगची तारीख तपासा.
- खाद्यतेलाचा पुनर्वापर : वारंवार उकळलेले अथवा तळलेले काळे तेल वापरलेले खाद्य पदार्थ खाऊ नका.
- पक्के देयक हाच हक्क : मिठाई किंवा खाद्यपदार्थ खरेदी करताना नेहमी पक्के देयक (बिल) घ्या. जेणेकरून भेसळ आढळल्यास कायदेशीर कारवाईसाठी भक्कम पुरावा हाती राहील.
धान्य, तेल खरेदीची बिले लागतील
- मुंडे यांनी जाहीर केलेल्या या नव्या नियमावलीनुसार, केटरर, ठेकेदार अधिकृत परवानाधारक हवा.
- कच्च्या मालाचा हिशेब : खाद्यतेल, तूप, खवा, मसाले व डाळी खरेदीचे पक्के बिल आणि अधिकृत स्रोत तपासणी अधिकाऱ्यांसमोर सादर करावा लागेल.
- कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी : स्वयंपाकी, वाटप करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याकडे वार्षिक वैद्यकीय तंदुरुस्ती प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे.