Headlines

शिवराईतील शिक्षण परिषदेत शैक्षणिक उपक्रमांवर मंथन:ए.आय. प्रशिक्षणासाठी पूर्वतयारीच्या सक्त सूचना‎




हतनूर कन्नड तालुक्यातील जि. प. उच्च प्राथमिक शाळा शिवराई (केंद्र हतनूर) येथे शिक्षण परिषद उत्साहात पार पडली. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख सिताराम आहेर, तर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सदस्य संतोष करवंदे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. यानंतर देशपांडे यांनी शिवराई शाळेचा शैक्षणिक आढावा मांडला. परिषदेत शिक्षकांसाठी विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले. अतुल अंबुरे यांनी ‘नवभारत साक्षरता कार्यक्रम’ व ‘निपुण महाराष्ट्र’ अंतर्गत अप्रगत मुलांना प्रगत करण्याबाबत आणि १२ आठवड्यांच्या ‘गुरू नेव्हिगेशन’ नियोजनावर मार्गदर्शन केले. विजय सोनावणे यांनी गणित पेटीचा वापर व अपूर्णांक संकल्पना स्पष्ट केली, तर गुरुनाथ नाकाडे यांनी ‘डॉ. जयंत नारळीकर गणित-विज्ञान समृद्धी कार्यक्रम’ आणि ‘खान अकॅडमी’च्या व्हिडिओंचा अध्यापनातील वापर यावर प्रकाश टाकला. नागणे यांनी श्रम व सहकार्यातून लोकसहभागाचे महत्त्व पटवून दिले. तसेच रमेश मालोदे व काथार यांनी शिक्षकांसाठी ‘अनापान’ साधनेचे महत्त्व विशद केले. अध्यक्षीय भाषणात केंद्रप्रमुख सिताराम आहेर यांनी केंद्राचा लेखाजोखा मांडत ए.आय. प्रशिक्षण, सी.सी.इ., माता-पालक गट आणि आगामी निपुण महाराष्ट्र चाचणीच्या पूर्वतयारीबाबत शिक्षकांना सूचना दिल्या. संतोष करवंदे यांनी गरजू शाळांना भौतिक सुविधा पुरवण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी केंद्रीय मुख्याध्यापक राजेश परदेशी, बाळासाहेब शेलार उपस्थित होते. यशस्वीतेसाठी शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. देशपांडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. शिवराई येथे विविध शैक्षणिक उपक्रमांवर शिक्षण परिषद पार पडली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *