![]()
समोर पाच आरोपी… मागे वैजापूर पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेचा फौजफाटा… बाजूला जप्त वाहन. २ सप्टेंबरचे हे ‘यशचित्र’ पाहिले तर सात दिवसांच्या कारवाईची सांगता झाल्यासारखी वाटते; पण हीच फ्रेम २६ ऑगस्टपर्यंत मागे नेली की श्रेयाच्या गर्दीत काही गंभीर चु
.
गुन्हा वैजापूर की वीरगावमध्ये नोंदवायचा, याचा निर्णय पुढे झाला असता. दरोडेखोर मात्र क्षेत्राधिकार ठरेपर्यंत रस्त्यावर थांबणार नव्हते. हातात संशयित वाहनांचे दृश्य असताना समृद्धीवरील पोलीस, टोलनाके, नियंत्रण कक्ष आणि पुढील ठाण्यांना खबर किती वाजता गेली? नाकेबंदी केव्हा लागली? एफआयआर कुणी घ्यायचा यावर घोळ झाला; पण
श्रेयात खांद्याला खांदा २ सप्टेंबरच्या फोटोमध्ये वैजापूर पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखा खांद्याला खांदा लावून दिसतात. मात्र २६च्या संध्याकाळीही दोन्ही यंत्रणांमधील माहिती एवढ्याच वेगाने फिरत होती का? कुणाकडे कोणता धागा होता.वरिष्ठांना वस्तुस्थिती केव्हा कळली? त्यात २७लाच संशयितांचे चेहरे मोबाइलवर फिरले.
उर्वरित घटनाक्रमही तेवढ्याच काटेकोरपणे तपासला जाणार का? फिर्यादीच्या कथित फिरवाफिरवीची वरिष्ठांनी दखल घेत वैजापूर व वीरगावच्या दोन कर्मचाऱ्यांची उचलबांगडी केली. मात्र सीसीटीव्ही, स्टेशन डायरी आणि नियंत्रण कक्षातील नोंदींना पदाची भीती नसते; त्या वेळ सांगतात. पीडित कधी आला? कुणाला भेटला? प्रभारींना केव्हा समजले? महामार्गाला पहिली सूचना किती वाजता गेली? त्यामुळे कर्मचाऱ्यांतही कुजबूज आहे. चूक फक्त दारावरच्या दोघांची होती, की निर्णय घेणाऱ्या साखळीतही कुठेतरी धागा तुटला होता? दोन नावांवर कारवाई झाली; आता उर्वरित घटनाक्रमही तेवढ्याच काटेकोरपणे तपासला जाणार का?