![]()
प्रेमसंबंध तोडल्याच्या रागातून बुलडाण्याहून आलेल्या एका युवकाने तरुणीचा पाठलाग करत विनयभंग केला. निराला बाजार, नागेश्वरवाडी परिसरात घडलेल्या या प्रकरणी क्रांती चौक ठाण्यात आरोपी महेंद्र राजेंद्र झिने (२७, रा. जि. बुलढाणा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात
.
आरोपी आणि संबंधित तरुणी यांची यापूर्वी चांगली ओळख होती. एप्रिल २०२६ मध्ये त्यांच्यात प्रेमसंबंध जुळले होते. मात्र, युवकाची वागणूक योग्य नसल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने त्याच्याशी सर्व संबंध संपवून बोलणे टाळण्यास सुरुवात केली. त्याच्या सततच्या त्रासाला आणि मनस्तापामुळे कंटाळून तरुणीने आपले मूळ गाव सोडले आणि शिक्षणासाठी छत्रपती संभाजीनगर गाठले. सध्या ती निराला बाजार परिसरातील एका खासगी क्लासमध्ये शिक्षण घेत आहे.
तरुणीला आरोपीने शोधून काढले
तरुणीने गाव सोडले तरी आरोपीने तिचा पिच्छा सोडला नाही. तो तिचा शोध घेत थेट छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचला. मंगळवारी (१ सप्टेंबर) दुपारी एकच्या सुमारास त्याने ती शिकत असलेल्या क्लासवर जाऊन गोंधळ घातला. त्यानंतर बुधवारी (२ सप्टेंबर) सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास नागेश्वरवाडी भागात क्लासला जात असताना त्याने पुन्हा तिला गाठले. भररस्त्यात तिचा हात पकडून आरोपीने तिला पुन्हा प्रेमसंबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केली. यानंतर तरुणीने क्रांती चौक पोलिस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध तक्रार नोंदवली. या घटनेचा पुढील तपास उपनिरीक्षक उत्तम जाधव करत आहेत.