शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने नागपुरात पुकारलेल्या ‘रामरक्षा आंदोलना’वरून भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर अत्यंत आक्रमक शब्दांत टीका केली आहे. हे आंदोलन म्हणजे रामाच्या भक्तीसाठी
.
संजय राऊतांच्या दाव्यांची उडवली खिल्ली
सोनम वांगचूक यांच्यावरील कारवाई ही उद्धव ठाकरेंच्या आंदोलनाला प्रसिद्धी मिळू नये यासाठी केल्याचा संजय राऊत यांचा दावा अतिशय हास्यास्पद असल्याचे बन म्हणाले. “उद्या अमेरिका आणि इस्रायल किंवा इराणचे युद्धही भाजपनेच या आंदोलनाचे लक्ष विचलित करण्यासाठी घडवून आणले, असा दावा करायला संजय राऊत कमी पडणार नाहीत,” असा टोला त्यांनी लगावला.
रामरक्षा वाचून दाखवण्याचे थेट आव्हान
देवेंद्र फडणवीस यांना आंदोलनाचे निमंत्रण देण्याआधी, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी पुस्तकात बघून तरी रामरक्षेचे किमान दोन श्लोक म्हणून दाखवावेत, असे खुले आव्हान त्यांनी दिले.
राम मंदिर आंदोलनातील योगदानावर प्रश्नचिन्ह
रामजन्मभूमी आंदोलनाच्या काळात बाबरीचा ढाचा पाडताना देवेंद्र फडणवीस स्वतः तिथे उपस्थित होते आणि त्यांनी पहिल्या आंदोलनात 14 दिवसांचा तुरुंगवास भोगला. “त्या वेळी उद्धव ठाकरे मातोश्रीवर कॅमेरे साफ करत बसले होते आणि संजय राऊत कुठेतरी लेख लिहित होते,” अशी बोचरी टीका त्यांनी केली.
‘इंडिया’ आघाडीवरून साधला निशाणा
ज्या काँग्रेसच्या सांगण्यावरून उद्धव ठाकरे रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला अनुपस्थित राहिले आणि ज्या समाजवादी पक्षाने रामभक्तांवर गोळ्या चालवल्या, त्यांच्यासोबत ठाकरे ‘इंडिया’ आघाडीत बसले आहेत. त्यामुळे त्यांना हिंदुत्ववादी म्हणवून घेण्याचा कोणताही अधिकार उरलेला नाही, असे बन यांनी स्पष्ट केले.
संघ भूमीवर नाक घासून माफी मागावी
हिंदुत्वाच्या तेजाचे प्रतीक असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमी नागपुरात आहे. हिंदुत्वाच्या पाठीत खंजीर खुपसल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी या संघ भूमीवर जाऊन नाक घासून माफी मागावी, तरच इथला हिंदू समाज त्यांना माफ करेल, अशी मागणी त्यांनी केली.
‘रामरक्षा’ नव्हे ‘पक्षरक्षा’ आंदोलन
ठाकरे गटाचा जनाधार संपला असून आमदार, नगरसेवक आणि कार्यकर्ते पक्ष सोडून जात आहेत. गळीतगात्र झालेल्या पक्षाला वाचवण्यासाठीच उद्धव ठाकरेंना प्रभू रामचंद्रांची आठवण झाली आहे. त्यामुळे हे रामरक्षा नसून ‘पक्षरक्षा’, ‘आमदार-रक्षा’ आणि ‘नगरसेवक-रक्षा’ आंदोलन आहे, अशी खिल्ली बन यांनी उडवली.
राम मंदिरातील कथित घोटाळ्यावर स्पष्टीकरण
राम मंदिर प्रकरणातील कथित घोटाळ्याच्या आरोपांवर बोलताना नवनाथ बन यांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी सुरू असून दोषींकडून पै न पै वसूल केली जाईल. मात्र, केवळ राजकीय स्वार्थापोटी आरोप करणाऱ्या विरोधकांचे कोणतेही डाव यशस्वी होणार नाहीत. ‘कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही’, असे सांगत त्यांनी महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेचा आशीर्वाद ‘देवा भाऊंच्या’ पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचा विश्वास व्यक्त केला.
संबंधित बातमी वाचा…
रामरक्षा आंदोलनासाठी उद्धव ठाकरे नागपुरात दाखल:वांगचूक यांच्या आंदोलनावरून केंद्रावर हल्लाबोल, म्हणाले- प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी किती जणांचे बळी घेणार?

अयोध्येतील राम मंदिराच्या दानपेटीत झालेल्या कथित चोरीप्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आक्रमक झाला आहे. मुंबईतील दादर येथील आंदोलनानंतर आज उपराजधानी नागपुरात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात ‘रामरक्षा आंदोलन’ करण्यात येत आहे. नागपूरच्या रामनगर येथील राम मंदिरात दुपारी 4:00 ते 4:30च्या सुमारास हे आंदोलन पार पडणार असून या आंदोलनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांना विशेष निमंत्रण देण्यात आले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
हुकूमशाही आणि दडपशाही सुरू:रामरक्षा आंदोलनावरून लक्ष हटवण्यासाठीच सोनम वांगचुक यांना उचलले; संजय राऊत यांचा आरोप

‘नीट’ पेपरफुटीच्या निषेधार्थ आणि केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीतील जंतरमंतरवर उपोषण करणारे सोनम वांगचुक यांना आज पोलिसांनी अचानक हटवून रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे आंदोलनस्थळी मोठा गोंधळ उडाला. या कारवाईनंतर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, शरद पवार आणि आदित्य ठाकरे यांच्यानंतर आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. वांगचुक यांच्यावर झालेली कारवाई ही दडपशाही असून, देशात हुकूमशाही सुरू असल्याची घणाघाती टीका राऊत यांनी केली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
पोलिसांनी वांगचुक यांना रुग्णालयात नेले, उपोषणाचा 21 वा दिवस:CJP संस्थापक दीपके म्हणाले -सोनम सरांना शिवीगाळ झाली, ओढत नेले; आंदोलक संतापले

दिल्लीतील जंतर-मंतर येथे २१ दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचुक यांना पोलिसांनी शनिवारी सकाळी सफदरजंग रुग्णालयात नेले. आंदोलकांनी पोलिसांच्या या कारवाईला विरोध केल्यामुळे घटनास्थळी गोंधळ निर्माण झाला. दुसरीकडे, ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक अभिजित दीपके यांनी आरोप केला की, पोलिसांनी सोनम यांना अपशब्द वापरले आणि बळजबरीने ओढत रुग्णालयात नेले. त्यांनी असाही दावा केला की, पोलिसांनी त्यांच्याशीही गैरवर्तन केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींच्या राजीनाम्याची मागणी केली. सविस्तर वाचा
सोनम वांगचूक प्रकरणावर विरोधक आक्रमक:सरकारच्या भूमिकेवर सवाल; शरद पवार, आदित्य ठाकरेंसह नेत्यांच्या प्रतिक्रिया

दिल्लीतील जंतरमंतर येथे नीट पेपरफुटी प्रकरणी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान उपोषणाला बसलेले सोनम वांगचूक यांना दिल्ली पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले आहे. सलग २१ दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेनंतर आंदोलनस्थळी मोठा गोंधळ उडाला असून देशभरातून विविध राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया उमटत आहेत. सविस्तर वाचा