Headlines

कळवणला मतदार यादी पुनरिक्षणाबाबत मार्गदर्शन:राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना माहिती‎




तालुक्यातील मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी, मतदार यादी अद्ययावत करण्याबाबत जनजागृती तसेच पक्ष संघटना अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शक्तीस्थळ, दळवट येथे संघटनात्मक आढावा बैठक उत्साहात पार पडली. यावेळी उपजिल्हाधिकारी हरिष भामरे आणि तहसीलदार रोहिदास वारुळे यांनी मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेबाबत उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. पात्र नागरिकांची मतदार म्हणून नोंदणी, नवमतदारांचा समावेश, मतदार यादीतील आवश्यक दुरुस्त्या, बूथस्तरावरील पडताळणी कशी करावी, याबाबत माहिती दिली. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे यांनी कळवण – सुरगाणा तालुक्यातील पक्ष संघटना नेहमीच सक्षमपणे कार्य करत असल्याचे नमूद करत त्यांनी प्रत्येक सोमवारी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी उपलब्ध राहणार असल्याची ग्वाही दिली. आमदार नितीन पवार यांनी दिलीप खैरे यांच्या कार्यशैलीचे कौतूक करत, पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी आपणही प्रत्येक सोमवारी राष्ट्रवादी भवनात उपस्थित राहून या उपक्रमात सहभागी होणार असल्याचे सांगितले. तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे यांनी प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट व्हावे आणि कोणताही पात्र मतदार वंचित राहू नये, यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जनजागृती करण्याचे आवाहन केले. उपसरपंच संदीप बेनके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तसेच पक्षात नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांसह विविध पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले.सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेबजी कर्डक, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयश्री पवार, नगराध्यक्ष कौतिक पगार, ऋषी पवार, रोहीत पगार उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *