Headlines

गर्दीतून मोबाइल चोरणाऱ्या दोघांना अटक:त्यांच्याकडून 2.27 लाखांचे 14 मोबाइल जप्त, मुंढवा पोलिसांची कारवाई




पुण्यात गर्दीतून मोबाइल चोरणाऱ्या दोघांना मुंढवा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून २ लाख २७ हजार रुपयांचे १४ मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. प्रणित नरेंद्र जाधव (वय २०, रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा) आणि राहुल सुरेश सहाणी (वय २२, रा. थिटे वस्ती, खराडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. जाधव आणि सहाणी यांनी गर्दीत नागरिकांचे मोबाइल चोरले होते. मुंढवा पोलीस या मोबाइल चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत होते. तपासात मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून १४ मोबाइल जप्त केले. पोलीस उपायुक्त जीवन बेनिवाल, सहायक आयुक्त अतुलकुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनीक आणि गुन्हे शाखेचे निरीक्षक सागर गोडे यांनी ही कारवाई केली. सहायक पोलीस निरीक्षक गणेश पिंगुवाले, उपनिरीक्षक युवराज पोमण, संभाजी नाईक, हवालदार विनोद साळुंके, राहुल धोत्रे, योगेश गायकवाड, शिवाजी धांडे, चेतन गायकवाड, राहुल मोरे, सचिन बोराटे आणि रुपेश तोडेकर यांच्या पथकाने ही कामगिरी केली. दरम्यान, सदाशिव पेठेत भरदिवसा घरफोडी झाली आहे. चोरट्यांनी एका सदनिकेचे कुलूप तोडून २ लाख २१ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरले. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार ६८ वर्षीय ज्येष्ठ महिला सदाशिव पेठेतील उषा:काल सोसायटीत राहतात. त्या सेवानिवृत्त आहेत. तक्रारदार आपली सदनिका बंद करून घराबाहेर पडल्या होत्या. त्याचवेळी चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले आणि कपाटातून २ लाख २१ हजार रुपयांचे दागिने चोरले. ज्येष्ठ महिला घरी परतल्यावर त्यांना घरफोडी झाल्याचे समजले. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक पोलीस निरीक्षक एस. कारके या प्रकरणाचा तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *