Headlines

एमआयटी स्कूल ऑफ ड्रामामध्ये कृष्णचरित्रावर साहित्यिक चर्चा व नाट्यप्रस्तुती:महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी, सहज कलात्मक फाउंडेशन व एमआयटी स्कूल ऑफ ड्रामाचा उपक्रम




महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी, सहज कलात्मक फाउंडेशन आणि एमआयटी स्कूल ऑफ ड्रामा, एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी (एडीटी) विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हिंदोत्सव २०२६’ अंतर्गत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात ‘आधुनिक साहित्यात कृष्ण’ या विषयावर साहित्यिक चर्चा आणि नाट्यप्रस्तुती सादर करण्यात आली. हा कार्यक्रम विद्यापीठातील राज कपूर सभागृहात पार पडला. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमाला सहज कलात्मक फाउंडेशनचे अध्यक्ष अरुण शेखर, महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचे सहसंचालक सचिन निंबाळकर, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. नचिकेत ठाकूर आणि एमआयटी स्कूल ऑफ ड्रामाचे विभागप्रमुख डॉ. अमोल देशमुख उपस्थित होते. त्यांच्यासोबत साहित्य, कला आणि रंगभूमी क्षेत्रातील अनेक मान्यवरही उपस्थित होते. कार्यक्रमात डॉ. सुनील देवधर आणि समीक्षा तेलंग यांनी ‘आधुनिक साहित्यात कृष्ण’ या विषयावर आपले विचार मांडले. आधुनिक साहित्यात भगवान कृष्णाच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू, त्यांची समकालीन संदर्भातील उपयुक्तता आणि साहित्यिक अभिव्यक्ती यावर चर्चा झाली. यानंतर अरुण शेखर यांनी लिहिलेल्या, एन.के. पंत यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि मिलिंद त्रिवेदी यांनी संगीत दिलेल्या ‘सुनो कन्हैया’ या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार आणि एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. यातून हिंदी साहित्य, रंगभूमी आणि भारतीय सांस्कृतिक परंपरेतील कृष्णविचार यांचा समकालीन दृष्टिकोनातून वेध घेण्यात आला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *