Headlines

मुखी विठ्ठल- विठ्ठल बोला, गजानन महाराजांचा शाही पालखी सोहळा:रूपाभवानी चौकात महापौर, आयुक्त, पोलिस आयुक्त यांच्या हस्ते महापूजा




पहाटे चार वाजता पालखी प्रस्थानाची लगबग सुरू झाली. ७०० वारकरी यांनी टाळ- मृदंगाचा निनाद केला. सनई चौघडा मंजुळ स्वर, बँडपथक, झेंडेकरी, वीणेकरी, टाळकरी रांगेत थांबले. पहाटेचा गारवा मनाला चैतन्य देत होता. गजानन महाराजांची आरती झाली. ‘गण-गण गणात बोते’चा जयघोष झाला. पहाटे साडेपाचला चहा घेऊन संतांचा मेळा सोलापूर शहाराकडे निघाला. उळे व पंचक्रोशीतील गावकरी भाविक, सेवेकरी भावूक झाले. महाराजांच्या आगमाने कालपासून गावात मंगलदायी वातावरण होते. हगलूर, तळेहिप्परगा मार्गावर दुतर्फा दर्शनासाठी भाविक जमले होते. मश्रुम गणपतीजवळ सकाळी साडेआठ वाजता महाआरती करण्याची ५६ वर्षांपेक्षा जास्त काळाची परंपरा. ‘मुखी विठ्ठल बोला. २८ दिवसांनी ता. १७ जुलै रोजी सोलापुरात. सोबत सातशे वारकरी, १४४ पताकाधारी, १५० सेवेकरी, ३१ सुरक्षा रक्षक, १२ बँडपथक, वाजंत्री, ५७ सेवेकरी, १ अश्व, नऊ वाहने, शेगाव ते पंढरपूर ७५० किलोमीटरचा प्रवास. ता. २३ ते २८ जुलै पंढरपुरात पालखी मुक्काम. १९ ऑगस्टला परत शेगावला पोहोचणार. -पहाटे चार ते रात्री सातपर्यंत पालखी नियोजन. पहाटे चार ते पाच नित्योपचार पूजा, सकाळी न्याहरी, दुपारी बाराला भोजन व सायंकाळी सातला भोजन, विश्रांती असे दैनंदिन नियोजन. मुक्काम स्थळावर रात्रभर पालखी दर्शनासाठी खुले असते. यावे‌ळी शहरातील भाविक दर्शन घेत असतात. प्रभाकर महाराज मंदिरात दुपारी बाराला पालखी आल्यानंतर गजानन महाराज व प्रभाकर महाराज पालखी भेटीचा सोहळा भाविकांनी अनुभवला. आरती झाली. ‘जय गुरू जय गुरू’ चा अखंड जयघोष झाला. भेटीचा सोहळा पाहून उपस्थित भाविकांना गहिवरून आले. तीन हजार भाविक आणि वारकरी यांच्यासाठी पिठलं-भाकरी, जिलेबी, चपाती, भात, आमटी महाप्रसाद देण्यात आला. चिफ ट्रस्टी मोहन बोड्डू, मॅनेजिंग ट्रस्टी बाळकृष्ण , शिंगाडे, ट्रस्टी उदय वैद्य, वसंत बंडगर, वामनराव वाघचौरे आदी सदस्यांनी नियोजन केले होते. . जय हरी विठ्ठल… ज्ञानोबा-माऊली तुकाराम जयघोषात रूपाभवानी चौकात पालखीचे आगमन झाले. महापौर विनायक कोंड्याल, धनश्री कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, महापालिका आयुक्त सचिन ओम्बासे, पोलिस आयुक्त एम. राजकुमार, सभागृह नेता नरेंद्र काळे यांच्यासह शासकीय अधिकारी, पोलिस, महापालिका अधिकारी उपस्थित होते. प्रभाकर महाराज मंदिरात पालखी भेटीचा सोहळा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *