Headlines

डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरण:माजी नगरसेवक रमेश म्हात्रे पोलिसांसमोर शरण, 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, कारागृहात रवानगी




डोंबिवली येथील केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिका मारहाण प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कठोर भूमिकेनंतर आणि विष्णुनगर पोलिसांनी बजावलेल्या कायदेशीर नोटिसीनंतर अखेर मुख्य आरोपी व माजी नगरसेवक रमेश म्हात्रे याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. कल्याण सत्र न्यायालयाने म्हात्रेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्याची कल्याणच्या आधारवाडी कारागृहात रवानगी करण्यात येत आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर विष्णुनगर पोलिस यंत्रणा पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आली. पोलिसांनी मध्यरात्रीच रमेश म्हात्रे याच्या निवासस्थानी नोटीस बजावून सायंकाळी ५ वाजेपूर्वी हजर राहण्याची अंतिम मुदत दिली होती. मुदतीत शरण न आल्यास मालमत्ता जप्त करण्याची कडक ताकीदही या नोटिसीमध्ये देण्यात आली होती. या कायदेशीर दबावामुळे म्हात्रे आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास स्वतःहून विष्णुनगर पोलिस ठाण्यात हजर झाला. आयएमएचा नियोजित २० जुलैचा संप अखेर मागे हल्ल्याच्या निषेधार्थ २० जुलै रोजी पुकारलेला संप इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) महाराष्ट्राने मागे घेण्याची घोषणा केली आहे. आरोपी शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे याला मंजूर केलेल्या जामिनाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी हा निर्णय घेण्यात आला. मात्र, डॉक्टरांच्या सुरक्षेबाबतच्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास ९ ऑगस्टपासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारण्याचा कडक इशाराही संघटनांनी दिला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *