Headlines

स्टील दुकानाच्या आडून चालणाऱ्या तांबे चोरीचा जामखेड पोलिसांकडून पर्दाफाश:शेती पंपाच्या 1,635 किलो तांब्याच्या तारांसह दुकानमालक पोलिसांच्या जाळ्यात‎




शहरातील तपनेश्वर रोडवरील एका नामांकित स्टील आणि भांड्याच्या दुकानावर जामखेड पोलिसांनी गुरुवारी (१६ जुलै) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास अचानक छापा टाकला. या कारवाईत पोलिसांना दुकानातून शेतीपंपासाठी वापरल्या जाणाऱ्या तांब्याच्या सोललेल्या तारांचे लहान-मोठे तुकडे असलेल्या तब्बल ३९ गोण्या आढळून आल्या. जप्त करण्यात आलेल्या या १,६३५ किलो तांब्याची बाजारपेठेतील किंमत ९ लाख ७९ हजार २०० रुपये आहे. याप्रकरणी पोलिसांनी दुकान मालकावर गुन्हा दाखल केला आहे. महेश मोहनलाल भंडारी (वय ४८ वर्षे, रा. तपनेश्वर रोड, जामखेड) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित दुकान मालकाचे नाव आहे. त्याचे तपनेश्वर रोडवर ‘साई समर्थ स्टील व भांड्याचे दुकान’ आहे. तपनेश्वर रोडवरील ‘साई समर्थ स्टील’ या दुकानात शेतीसाठी उपयुक्त असलेल्या तांब्याच्या लहान-मोठ्या तारांचा साठा बेकायदेशीररी्या ठेवण्यात आल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित मोरे व त्यांच्या पथकाने गुरुवारी रात्री दुकानावर धडक कारवाई केली. पोलिसांनी छाप्यानंतर दुकान मालक महेश भंडारी याच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणावर असलेल्या तांब्याच्या तारांच्या मालकी हक्काबाबत विचारणा केली. मात्र, त्याला कोणत्याही प्रकारची वैध कागदपत्रे किंवा खरेदीची पावती सादर करता आली नाही. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल कुलदीप घोळवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी महेश भंडारी याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १२४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणातील तांब्याच्या तारा चोरीच्या आहेत का आणि हा माल नेमका कुठून आणला गेला, याचा सखोल तपास सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित मोरे करत आहेत.या कारवाईमुळे चोरीचा माल घेणाऱ्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. मालाबाबत दिली उडवाउडवीची उत्तरे पोलिसांनी दुकानाची झडती घेतली असता, तिथे ३९ गोण्यांमध्ये भरून ठेवलेल्या शेती पंपाच्या लहान-मोठ्या सोललेल्या तांब्याच्या तारांचे तुकडे आढळून आले. पोलिसांनी या मालाबाबत दुकानमालक महेश भंडारी याच्याकडे खरेदीची कागदपत्रे आणि अधिकृत बिलांची मागणी केली. मात्र, भंडारी याने कोणतेही कागदपत्रे सादर केले नाहीत व पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. हा माल चोरीचा असल्याची पोलिसांची खात्री पटल्याने पोलिसांनी साठा जप्त केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *