Headlines

अभिवादन:व्यक्तिस्वातंत्र्य, मानवी प्रतिष्ठेचा आग्रह तर सामाजिक गुलामगिरीचा निषेध ही बाबासाहेबांची विचारप्रणाली




व्यक्तिस्वातंत्र्य, मानवतेची प्रतिष्ठा यासाठी आग्रह तर सामाजिक गुलामगिरीचा निषेध ही बाबासाहेबांची विचारप्रणाली होती. त्यांना सदैव प्रेरणा देणारे गुरु भगवान बुद्ध, संतकवी कबीर, महात्मा फुले तर विद्या, विनय, शील ही त्यांची दैवते होती. स्वातंत्र्य, समता, बंधूता या तत्वांवर त्यांची अचल निष्ठा होती. शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा हा दिव्य संदेश त्यांनी दिला. समाजशास्त्र, शिक्षण, अर्थशास्त्र, तत्वज्ञान या विषयांबरोबरच महिला, कामगारांचे प्रश्न व शेती धोरण यामध्ये त्यांनी विशेष योगदान दिले. ते श्रेष्ठ कायदेपंडित, लोकशाही मूल्यांसाठी लढणारे नेते व भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून त्यांची स्मृती चिरंतन राहणार आहे असे विचार जयकुमार शितोळे यांनी व्यक्त केले. येथील कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालयामध्ये भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यावेळी अध्यक्षपदावरून ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे सेवानिवृत्त ग्रंथपाल अशोक गवळी, गायक सुनिल फल्ले, समाजसेवक बप्पा सुतार, ग्रंथालयाचे उपाध्यक्ष धैर्यशील देशमुख हे उपस्थित होते. प्रथमत: डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून करण्यात आले. यावेळी अशोक गवळी, बप्पा सुतार यांनी आपले यथोचित मनोगत व्यक्त करीत जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी गायक सुनिल फल्ले यांनी आपल्या सुंदर आवाजात “उगवली सोनियाची सकाळ, जन्मास आले भीम बाळ” हे गीत सादर करीत बाबासाहेबांना अनोखे अभिवादन केले. यावेळी प्रतिमेच्या शेजारी भारतीय संविधान व डॉ.बाबासाहेबांचे चरित्र ग्रंथ माहितीसाठी ठेवण्यात आले होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *