![]()
छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी आमदार विलास भुमरे यांची निवड झाली आहे, तर रामराव शेळके उपाध्यक्ष बनले आहेत. अध्यक्षपदासाठी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात दोन-दोन-एक वर्षांचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. खासदार संदिपान भुमरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यानुसार, पहिल्या दोन वर्षांसाठी शिवसेनेला अध्यक्षपद मिळाले आहे. पुढील दोन वर्षे भाजप आणि शेवटच्या एका वर्षासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला हे पद मिळेल. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी सोमवारी जिल्हा मध्यवर्ती बँकेत बैठक झाली. या बैठकीला सर्व संचालक उपस्थित होते. खासदार संदिपान भुमरे, ओबीसी विकास मंत्री अतुल सावे आणि आमदार अब्दुल सत्तार यांनी यावेळी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या निवडीची घोषणा केली. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदासाठी जोरदार चर्चा सुरू होती. दोन्ही पक्षांनी हे पद आपल्याकडे घेण्यासाठी अनेक बैठका घेतल्या होत्या. अखेर शिवसेनेला अध्यक्षपद मिळाले असून, भाजपला उपाध्यक्षपद मिळाले आहे.
Source link
छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेचे अध्यक्षपद शिवसेनेला:विलास भुमरे अध्यक्ष, रामराव शेळके उपाध्यक्ष; दोन वर्षांसाठी फॉर्म्युला निश्चित