Headlines

अमरावतीमध्ये मध्यरात्री दुहेरी हत्याकांड:बसस्थानक परिसरात दोन तरुणांची निर्घृण हत्या; हत्येचे कारण अस्पष्ट




अमरावती जिल्ह्यातील वलगाव येथे मध्यरात्री एका भीषण दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. वलगाव बसस्थानक परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी दोन तरुणांची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली आहे. या घटनेमुळे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस फरार आरोपींच्या मागावर आहेत. मध्यरात्रीचा थरार अन् दोन तरुणांचा अंत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजोग जोशी (वय २४) आणि ऋतिक पंडित (वय २५) अशी या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या दोन तरुणांची नावे आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास हे दोघे वलगाव बसस्टँड परिसरात असताना अज्ञात आरोपींनी त्यांच्यावर अचानक जीवघेणा हल्ला चढवला. हा हल्ला इतका भयानक आणि क्रूर होता की, संजोग आणि ऋतिक या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. ऐन तारुण्यात मुलांची अशाप्रकारे हत्या झाल्याने दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. हत्येचे नेमके कारण काय? या दुहेरी हत्याकांडामागे नेमके काय कारण आहे, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. हा हल्ला एखाद्या जुन्या वादातून झाला आहे, वैयक्तिक वैमनस्यातून झाला आहे, की यामागे आणखी काही मोठे कारण आहे? याचा उलगडा अद्याप झालेला नाही. घटनेची माहिती मिळताच वलगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवून दिले. आरोपी अद्याप फरार, पोलिसांची पथके रवाना घटनेला अनेक तास उलटून गेल्यानंतरही पोलिसांच्या हाती अद्याप कोणताही ठोस धागादोरा लागलेला नाही आणि हल्लेखोर फरार आहेत. वलगाव पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. हल्लेखोरांचा लवकरात लवकर माग काढण्यासाठी पोलिसांची विविध पथके रवाना करण्यात आली आहेत. पोलीस सध्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी करत असून, तांत्रिक पुराव्यांच्या आधारे सर्व बाजूंनी या हत्याकांडाचा तपास युद्धपातळीवर सुरू आहे. हेही वाचा.. समृद्धी महामार्गावर भीषण अपघात:इथेनॉल टँकर पलटल्याने सुरू होती एकेरी वाहतूक, ट्रकच्या धडकेनंतर कार पेटली; 6 जणांचा मृत्यू समृद्धी महामार्गावर वर्ध्यातील विरूळ गावाजवळ पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. नागपूरकडे जाणाऱ्या एका कारला मागून भरधाव येणाऱ्या मालवाहू वाहनाने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भयंकर होती की, अपघात होताच कारने अचानक पेट घेतला आणि आगीच्या मोठ्या ज्वाळा उसळल्या. या दुर्घटनेत कारमधील चार जणांना बाहेर पडण्याची कोणतीही संधी मिळाली नाही आणि ते आतच जिवंत होरपळले. तर धडक देणाऱ्या मालवाहू वाहनातील दोन व्यक्तीचांही मृत्यू झाला असून, अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *