Headlines

आदित्य ठाकरेंना भगवी टोपीही नको:उद्धव ठाकरे-राऊतांना बाजूला करून आदित्य ठाकरेंना पक्षाचे नेतृत्व हवे- नवनाथ बन




आदित्य ठाकरे यांनी काल शिवतीर्थावर भगवी टोपी काढून आंदोलन सुरू केले. यांनी यापूर्वी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार धुडकावून लावले, आणि आता यांना भगवी टोपी सुद्धा नको आहे, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. आदित्य ठाकरेंना नेतृत्व करायचे असेल तर त्यांनी भगवी टोपी हाती घेतली पाहिजे. हिंदु्त्वाचे विचार ठेवले पाहिजे तर तुमचा पक्ष टिकेल. आदित्य ठाकरेंची इच्छा आहे की उद्धव ठाकरे, संजय राऊत यांना बाजूला करत संपूर्ण नेतृत्व आपल्या हाती यावे. नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत यांनी ईडीवर मोर्चा काढला होता कारण त्यांना भ्रष्टाचार करण्याची सवय आहे. ईडीचे दुखने काय असते हे त्यांना माहिती आहे.पत्राचाळ घोटाळ्यात हजारो कोटी लुटणाऱ्या राऊतांना ईडीने अटक केली होती. त्या प्रकरणी तुम्ही जामीनावर बाहेर आहात म्हणून उगाच ईडी ईडी करू नका. यांच्या मनाप्रमाणे सर्व काही झाले तर सर्व यंत्रणा चांगल्या असतात पण विरोधात निकाल गेला तर निवडणूक आयोग, ईडी, न्यायालय यावर शंका उपस्थित करत राऊत दुटप्पी भूमिका घेत आहे. प्रभू श्री राम संपूर्ण जगाचे रक्षण करतात नवनाथ बन म्हणाले की, रामाची रक्षा करण्यासाठी आम्ही आंदोलन करतो आहोत असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. परंतू उद्धव ठाकरे हे विसरले की प्रभु श्री राम संपूर्ण विश्चाची रक्षा करत असतात. तुम्ही त्यांची रक्षा करण्याची गरज नाही. तुम्ही पक्षरक्षेचा विचार केला तर बरं होईल. जो प्रभु श्री रामांच्या कामाचा नाही तो कोणत्याच कामाचा नाही हे सर्वांना माहिती आहे. प्रभु रामचंद्राचे रक्षण करण्यासाठी तुम्ही आंदोलन करू नको ते जगाचे रक्षण करण्यासाठी सक्षम आहेत. देशातील तरुण राष्ट्रभक्त नवनाथ बन म्हणाले की, जंतर मंतरवर जे आंदोलन सुरू आहे त्या संदर्भात पोलिसांनी जो निर्णय घेतला आहे तो हायकोर्टाच्या निर्णयाने घेतला आहे. संजय राऊत यांनी उगाच तरुणांची माथी भडकवण्याचे काम करू नये. हे सर्व तरुण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठिशी आहेत. राऊतांची देश पेटवण्याची कितीही इच्छा असली तरीही तसे काहीच होणार नाही. कारण इथला तरुण राष्ट्रभक्त असून तो मोदी यांच्या पाठिशी उभा आहे. आंदोलनाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे. तेवढी राऊतांची पात्रता नाही नवनाथ बन म्हणाले की, गिरीश महाजन हे 7 वेळा निवडून आले आहेत, ज्यांना आपल्या भांडूपमधील निवासस्थान असणाऱ्या परिसराचा नगरसेवक निवडून आणता येत नाही त्या संजय राऊत यांनी महाजन यांच्यावर बोलू नये. तेवढी पात्रता तुमची नाही कारण जनतेने तुम्हाला एकदाही निवडून दिलेले नाही. राऊत हे काँग्रेस आणि राहुल गांधी यांचे गुलाम आहेत. ते त्यांचाच अजेंडा पुढे नेत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *