Headlines

अजित पवार जयंतीनिमित्त पुणे-बारामती सायकल स्पर्धा:यंदाचे सातवे वर्ष; पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृती




पुणे जिल्हा शिक्षण मंडळातर्फे संस्थेचे माजी अध्यक्ष आणि माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त बुधवार, दि. २२ जुलै रोजी पुणे ते बारामती राष्ट्रीय व राज्यस्तरीय सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया, नवी दिल्ली आणि सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या सहकार्याने होणाऱ्या या स्पर्धेचे यंदाचे सातवे वर्ष आहे. पर्यावरण संवर्धन, आरोग्यवर्धन, ‘बेटी बचाओ’, स्वच्छता अभियान तसेच वाहतूक आणि प्रदूषणाबाबत जनजागृती करणे हा स्पर्धेचा प्रमुख उद्देश आहे. स्पर्धेत कर्नाटक, आंध्र प्रदेश, चंदीगड, तमिळनाडू, गुजरात, नवी दिल्ली, महाराष्ट्रासह विविध राज्यांतील तसेच सेनादल, हवाई दल आणि रेल्वे संघांतील सुमारे ४५० ते ५०० राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकलपटू सहभागी होणार आहेत. सर्वांसाठी खुल्या असलेल्या सायकल रॅलीत तीन ते साडेतीन हजार विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिक सहभागी होण्याची अपेक्षा आहे. स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सकाळी ८.४५ वाजता पुण्यातील शनिवारवाडा येथे होणार आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होईल. यावेळी विविध राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अजितदादा यांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या कामाची पोकळी निर्माण झाली आहे .मात्र, त्यांच्या आठवणी या पुढील काळात देखील जागृत ठेवले जातील असे मत आयोजकांनी व्यक्त केले. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ त्याच दिवशी दुपारी २ वाजता बारामतीतील गदिमा सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके दिली जाणार असल्याची माहिती पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव अॅड. संदीप कदम यांनी दिली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *