![]()
वडगाव फत्तेपूर-परसापूर मार्गावर झालेल्या एका रस्ते अपघातात रामपुरी कॅम्प परिसरातील गौरव वाधवा यांचा मृत्यू झाला. दुचाकीसमोर अचानक वन्यप्राणी आल्याने हा अपघात घडला. गौरव वाधवा अचलपूरहून अमरावतीकडे येत असताना हा दुर्दैवी प्रसंग घडला. परतवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव नंदलाल वाधवा हे कपड्यांच्या व्यवसायाच्या वसुलीच्या कामासाठी नियमितपणे या मार्गावरून प्रवास करत होते. सोमवारी दुपारी ते एमएच-२७/सीवाय-७९८४ क्रमांकाच्या होंडा दुचाकीने अचलपूरहून अमरावतीकडे निघाले होते. वडगाव फत्तेपूर ते परसापूरदरम्यान त्यांच्या दुचाकीसमोर अचानक वन्यप्राणी आल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या गौरव वाधवा यांना अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. पथ्रोट पोलिसांनी या अपघाताची नोंद केली असून, मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. गौरव वाधवा यांच्या निधनाची बातमी रामपुरी कॅम्प परिसरात समजताच परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात मोठा आप्त परिवार आहे.
Source link
वन्यप्राणी आडवा आल्याने वडगाव फत्तेपूर-परसापूर मार्गावर अपघात:रामपुरी कॅम्पमधील युवकाचा मृत्यू, पोलिस तपास सुरू