Headlines

खेळी:खासदार भुमरे, सत्तारांच्या धनुष्यबाणाचा अचूक वेध, जिल्हा बँकेसाठी भुमरे-सत्तार-शिरसाटांनी लावून धरला 2-2-1 चा फॉर्म्युला




जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे विलास भुमरे यांची, तर उपाध्यक्षपदी भाजपचे रामराव शेळके यांची बिनविरोध निवड झाली आहे. खासदार संदिपान भुमरे, आमदार अब्दुल सत्तार आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांनी भाजपच्या अध्यक्षपदाच्या मागणीला प्रतिसाद दिला नाही. अध्यक्षपद शिवसेनेलाच हवे ही भूमिका त्यांनी शेवटपर्यंत लावून धरली. शिवसेनेचे संख्याबळ अधिक असल्यामुळे अखेर शिवसेना २ वर्षे, भाजप २ वर्षे आणि राष्ट्रवादी काँग्रेस १ वर्ष असा अध्यक्षपदाचा २-२-१ फॉर्म्युला निश्चित करण्यात आला. बिनविरोध निवडीची घोषणा होताच शिवसेना व भाजपच्या कार्यकर्त्यांनी बँक परिसरात जोरदार जल्लोष केला. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षपद कुणाकडे द्यायचे, यावरून महायुतीमध्ये मतभेद होते. मात्र रविवारी रात्री झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या विलास भुमरे यांचे नाव अध्यक्षपदासाठी अंतिम करण्यात आले. निवडणुकीपूर्वी खासदार संदिपान भुमरे आणि इतर प्रमुख नेत्यांनी अध्यक्ष व उपाध्यक्षपदाचा फॉर्म्युला जाहीर केला. अर्ध्या तासात निवडीची प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी सम्रत जाधव यांनी सोमवारी सकाळी ११ वाजता निवड प्रक्रिया सुरू केली. अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी केवळ एक-एकच अर्ज आल्यामुळे अर्जांची छाननी करण्यात आली. दोन्ही उमेदवारांना विजयी घोषित करण्यात आले. विलास भुमरे यांच्या अर्जासाठी पालकमंत्री संजय शिरसाट सूचक होते. भाजप नेते मंत्री अतुल सावे अनुमोदक होते. उपाध्यक्षपदासाठी रामराव शेळके यांच्या अर्जासाठी अर्जुन पाटील सूचक होते. आमदार रमेश बोरनारे अनुमोदक होते. सकाळी ठरला भाजपचा उपाध्यक्षपदाचा उमेदवार भाजपकडून दिनेश परदेशी यांच्या नावाची चर्चा उपाध्यक्षपदासाठी आघाडीवर होती. परदेशी यांनी मतदानासाठी संचालकांना फोनही केले होते. मात्र भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी थेट मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला. रामराव शेळके यांचे नाव अंतिम केले. ऐन वेळी सूत्रे फिरली. कुठेही अवांछित चर्चा करू नका; मंत्री सावेंचा दम अर्ज भरण्यापूर्वी महायुतीचे नेते एकत्रित चर्चा करत होते. त्या वेळी अब्दुल सत्तार हे राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याशी बँकेतील राजकीय स्थितीबाबत चर्चा करत होते. ही बाब निदर्शनास येताच ओबीसी विकास मंत्री अतुल सावे यांनी, “इथे जाहीरपणे चर्चा करण्याची ही वेळ नाही. कुठेही काहीही बोलू नका,” असे म्हणत मध्यस्थी केली. जिल्हा परिषदेतील चुका आम्ही टाळल्या : संजय शिरसाट पालकमंत्री संजय शिरसाट यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आमच्याकडून काही चुका झाल्या होत्या. मात्र या निवडणुकीत आम्ही सर्व घटक पक्ष एकत्र आलो. महायुती एकत्र आली की विजय निश्चित असतो. हेच निकालातून दिले आहे. बँकेचे योग्य नियोजन करून शेतकऱ्यांना लाभ देणार महायुतीची सत्ता जिल्हा बँकेवर आली आहे. अनुभवी नेते व संचालक आमच्या सोबत आहेत. आगामी काळात बँकेचे योग्य नियोजन करू. सरकारच्या विविध योजनांचा लाभ थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवू. बँकेला प्रगतीपथावर नेऊ. हा आमचा प्रयत्न राहील.- विलास भुमरे, अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँक शिवसेनेचा तब्बल दोन तास आनंदोत्सव मनपा आणि जि.प. निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्यामुळे या विजयानंतर शिवसैनिकांनी बँक परिसरात ढोल-ताशांच्या गजरात २ तास जल्लोष केला. कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित अध्यक्षांना आणि खासदार संदिपान भुमरे यांना खांद्यावर उचलून घेत आनंदोत्सव साजरा केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *