![]()
जेलरोड परिसरातील अरिंगळे चाळीत आर्थिक विवंचनेने ग्रासलेल्या पतीने पत्नी आणि अवघ्या ७ वर्षांच्या चिमुरड्याची धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण हत्या केली. या भयंकर कृत्यानंतर पतीने स्वतः विषारी औषध प्राशन करून जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला. त्या
.
गेल्या काही दिवसांपासून तो प्रचंड आर्थिक अडचणीत होता. याच विवंचनेतून रविवारी मध्यरात्री त्याने झोपेत असलेल्या पत्नी व मुलाचा चाकूने गळा चिरला. सोमवारी सकाळी दरवाजा न उघडल्याने आणि घरातून तीव्र दुर्गंधी येऊ लागल्याने शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी खिडकीतून पाहिले असता मायलेक रक्ताच्या थारोळ्यात आणि किरण निपचित पडलेला दिसला. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी दार तोडून मृतदेह ताब्यात घेतले आणि किरणला रुग्णालयात दाखल केले.
४८ तासांत दुसरी हत्या
दोन दिवसांपूर्वीच इंदिरानगर येथे एकतर्फी प्रेमातून वैष्णवी आवारे या तरुणीची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर तिला मारणाऱ्या प्रियकरानेही गळफास घेत आत्महत्या केली होती. या प्रकरणाला ४८ तास उलटत नाहीत, तोच हे दुसरे भयंकर हत्याकांड घडल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
दोघांचाही होता दुसरा विवाह, मोठा मुलगा सुदैवाने बचावला
मृत किरण आणि अश्विनी या दोघांचाही हा दुसरा विवाह होता. श्रेयस दुसऱ्या इयत्तेत शिकत होता. अश्विनीचा पहिल्या विवाहापासून झालेला १८ वर्षांचा मोठा मुलगा आजी-आजोबांकडे राहत असल्याने सुदैवाने बचावला. काही दिवसांपूर्वीच तिच्या लहान बहिणीचा रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. त्यातच आता तिचीही हत्या झाल्याने कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.