Headlines

कल्याण येथे प्रियकराची हत्या करून महिला पसार:घरमालकाला व्हॉइस मेल, ‘नळ चालू, आत बॉडी आहे!




कल्याणच्या मलंग रोड परिसरातील नीलकंठ सोसायटीत एका महिलेने प्रियकराची डोक्यात वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी उघडकीस आली आहे. हत्येनंतर पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपी महिलेने आखलेली थरारक योजना पाहून सराईत गुन्हेगारही चक्रावून गेले आहेत. मृतदेहाची ओळख मिटावी आणि तो लवकर सडावा म्हणून महिलेने तब्बल २४ तास बाथरूममधील नळ चालू ठेवला होता. मानपाडा पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला असून फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाचा ताबा घेतला आहे. पसार झालेल्या आरोपी महिलेच्या तपासासाठी पोलिसांची विशेष पथके कोलकाताकडे रवाना झाली आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांपासून बंद घरातून प्रचंड दुर्गंधी येत असल्याने रहिवाशांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरात सगळीकडे भयाण शांतता होती, पण बाथरूमच्या दिशेने जाताच पोलिसांना पाण्याचा आवाज आला. तपास केला असता गोणीत सडलेल्या अवस्थेत पुरुषाचा मृतदेह आढळला. हत्या केल्यानंतर आरोपी महिलेने मृतदेह गोणीत कोंबून बाथरूममध्ये ठेवला. सोसायटीत पाणी आले, की ते पाणी थेट गोणीवर पडेल, अशा पद्धतीने नळ चालू ठेवला. पाण्याच्या सततच्या प्रवाहाने रक्ताचे डाग वाहून जावेत व मृतदेह पाण्यात भिजून लवकर सडून पुरावे नष्ट व्हावेत, हा यामागचा कुटिल डाव होता. शनिवारी घरमालकाच्या मोबाइलवर एक व्हॉइस मेल पाठवला. फ्लॅटमधील बाथरूमचा नळ चालू राहिला आहे आणि तिथे एक डेड बॉडी ठेवली आहे, त्याची विल्हेवाट लावा, असा संदेश ऐकून घरमालकाच्या पायाखालची जमीन सरकली. क्राइम शो’, विकृत प्लॅनिंग मृतदेहावर सतत पाणी सोडून फिंगरप्रिंट्ससारखे जैविक पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न, हा विकृत मानसिकतेचा कळस आहे. वेब सिरीज आणि क्राइम शो पाहून ही शक्कल लढवल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हत्या करून पळून गेल्यानंतर घरमालकाला व्हॉईस मेल पाठवणे, हा केवळ गुन्ह्याचा कबुलीजबाब नाही तर पोलिसांना दिलेले उघड “चॅलेंज’ आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *