Headlines

महायुतीतील वाद मिटल्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत बदलाचे वारे:जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतील एकीचा परिणाम



महापालिका आणि जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना, भाजप यांच्यात राजकीय संघर्ष टोकाला पोहोचला होता. दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या विरोधात लढवल्या. मात्र, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत महायुतीचे तिन्ही पक्ष एकत्

.

राज्यात महायुतीचे सरकार असले तरी छत्रपती संभाजीनगरात महायुतीच्या नेत्यांमध्ये कायम तणावाचे वातावरण पाहायला मिळत होते. मनपा आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढल्या. त्यानंतर विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलाने अर्ज भरल्यामुळे तणाव वाढला होता. मात्र, त्यानंतर झालेल्या चर्चेमुळे पुढील राजकीय वाद टळले; तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या राजकारणात सर्वच नेते एकत्र आले.

सत्तार यांनी दिले बदलाचे संकेत

“आता महायुतीत आमच्यात कुठलेही वाद नाहीत. त्यामुळे आम्ही एकत्र येऊन अध्यक्षही निवडला आहे. आगामी काळात हे बदल पाहायला मिळतील आणि जिल्हा परिषदेतही याचे पडसाद उमटतील,’ असे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले. याबाबत पालकमंत्री संजय शिरसाट म्हणाले, “मधल्या काळात आमच्यात तणाव निर्माण झाला होता, मात्र आम्ही एकत्रित निर्णय घेतले आहेत. ’ सत्तारांच्या वक्तव्याबाबत मंत्री सावे म्हणाले, “सध्या येथे आम्ही एकत्र लढलो आहोत. जिल्हा परिषदेत पुढच्या काळात काही निर्णय होतील, त्यावर आताच बोलणे उचित नाही.’



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *