![]()
मोठी स्वप्ने पाहण्यासाठी आर्थिक परिस्थिती अडथळा ठरत नाही तर जिद्द, चिकाटी आणि परिश्रम यांची खरी आवश्यकता असते. विद्यार्थ्यांनी विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम यांकडेही जास्तीत जास्त लक्ष देण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन शालेय समितीचे चेअरमन श्री
.
कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सामान्य कुटुंबातील मुलांनीही जागतिक स्तरावर यश मिळविल्याची अनेक उदाहरणे सांगितली. त्यांनी एका सामान्य घरातील विद्यार्थ्याने तयार केलेल्या अत्याधुनिक रोबोटचा उल्लेख करून, मोठी स्वप्ने पाहण्यासाठी आर्थिक परिस्थिती अडथळा ठरत नाही, तर जिद्द, चिकाटी आणि मेहनत यांची आवश्यकता असते, असे सांगितले. विद्यार्थ्यांनी विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम याकडेही लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी केले.
मुख्याध्यापक अजय महाजन यांनी शाळेत वर्षभर राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक आणि व्यक्तिमत्त्व विकासाच्या उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी अशा उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन स्वतःच्या सुप्त गुणांना वाव द्यावा, आत्मविश्वास वाढवावा आणि सर्वांगीण विकास साधावा, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लीना बंगाळ यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय वैशाली मगर यांनी करून दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अजय महाजन यांनी केले तर आभार सतीश मेढे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.
आनंददायी शनिवार – दप्तरमुक्त शनिवार’ या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांच्या चौकटीबाहेर जाऊन प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी मिळाली. जीवनात यश मिळविण्यासाठी सकारात्मक विचार, मेहनत, सातत्य, चांगले संस्कार आणि आई-वडिलांचा सन्मान या मूल्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या मनावर प्रभावीपणे बिंबविणारा हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला.
जीवनात कोणताही शर्टकट वापरू नका या उपक्रमासाठी उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्या प्रियांका चिखले यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्वतःची स्वप्ने स्वतःच पूर्ण करा. प्रत्येक स्पर्धेत भाग घ्या, कारण प्रत्येक स्पर्धा आपल्याला नवीन अनुभव देते. आई-वडिलांचे कष्ट नेहमी लक्षात ठेवा आणि त्यांचा सन्मान करा. आजूबाजूच्या वाईट गोष्टींकडे लक्ष न देता चांगल्या गोष्टींचा स्वीकार करा. जीवनात कोणताही शॉर्टकट वापरू नका असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.