Headlines

हे कटू सत्य स्वीकारायला माझं मन आजही तयार होत नाही:अजितदादांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवारांची भावुक पोस्ट




राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांची आज जयंती आहे. २८ जानेवारी रोजी बारामतीजवळ झालेल्या अत्यंत दुर्दैवी विमान अपघातात अजितदादांचे निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतरची ही पहिलीच जयंती असल्याने संपूर्ण राज्यभरात आणि पवार कुटुंबात अत्यंत भावूक वातावरण आहे. राज्याच्या विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज सकाळी त्यांचे सुपुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांच्यासह अजितदादांच्या स्मृतीस्थळी जाऊन त्यांना आदरांजली वाहिली. यावेळी सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली असून, ‘हा दिवस जयंती म्हणून स्वीकारायला मन तयार नाही’, अशा अत्यंत वेदनादायी भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. स्मृतीस्थळी वाहिली आदरांजली महाराष्ट्राच्या राजकारणात आपला वेगळाच दबदबा निर्माण करणाऱ्या अजित पवारांचा २८ जानेवारी २०२६ रोजी विमान अपघातात दुर्दैवी अंत झाला. आज त्यांची जयंती असल्याने राज्यभरातून त्यांना अभिवादन केले जात आहे. आज सकाळीच राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती येथील अजित पवारांच्या स्मृतीस्थळी जाऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत खासदार पार्थ पवार आणि जय पवार उपस्थित होते. आपल्या लाडक्या नेत्याची पहिलीच जयंती असल्याने कार्यकर्त्यांचेही डोळे पाणावले होते. सुनेत्रा पवार यांची पोस्ट जशीच्या तशी.. दादा… एवढी वर्ष तुमचा जन्मदिवस मी अगदी आनंदाने, उत्साहाने आणि अभिमानाने साजरा केला… घर , कुटुंब आनंदात असायचं, शुभेच्छांचा वर्षाव असायचा.. पण आज तुमचा हाच दिवस ‘जयंती’ म्हणून मानताना माझं मन आतून पार तुटून जातंय. हे कटू सत्य स्वीकारायला माझं मन आजही अजिबात तयार होत नाही दादा… आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुम्ही माझी सर्वात मोठी ताकद बनून सोबत राहिलात. तुमचा तो भक्कम आधार, कठीण प्रसंगात पाठीवर पडणारी तुमची विश्वासू थाप आणि मला दिलेली साथ… आज हे सगळं अचानक हरवून गेलंय, सगळं सगळं पोरकं झालंय यावर विश्वासच बसत नाही. काळाने माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार एवढ्या लवकर हिरावून नेईल, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. आज तुमचा हा दिवस साजरा करताना काळीज पिळवटून निघतंय, डोळ्यांतील अश्रू थांबायचं नाव घेत नाहीत. दादा, तुम्ही भलेही आज माझ्यासोबत शारीरिकदृष्ट्या नसलात, तरी तुमचे विचार, तुमच्या आठवणी , तुमचा लोकांप्रती सेवाभाव, शिस्त आणि तुम्ही दिलेलं प्रेम माझ्या प्रत्येक श्वासात, कणाकणात कायम जिवंत राहील…
माझ्या आयुष्याच्या साथीदाराला, तुमच्या पवित्र आठवणींना भावपूर्ण आणि आदरपूर्वक प्रणाम…! हेही वाचा.. राज्यात पुन्हा मुसळधार:पुणे, नाशिक, कोकणासह विदर्भातही जोरदार पावसाचा अलर्ट, मराठवाड्यातही पावसाची शक्यता जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दमदार हजेरी लावल्यानंतर काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने राज्यात पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केले आहे. अरबी समुद्रापासून बंगालच्या उपसागरापर्यंत निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात मुसळधार पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. आज हवामान विभागाने पुण्याच्या घाटमाथ्यासाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला असून, मुंबईत ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. तसेच, ठाणे, पालघर, रायगडसह अनेक जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *