![]()
गव्हाली गव्हाली परिसरात खरीप हंगामातील पेरणी अंतिम टप्प्यात पोहोचली असून, सिल्लोड एकूण ९९ हजार ८७ हेक्टर पेरणीयोग्य क्षेत्रापैकी तब्बल ९३ हजार ७९५ हेक्टरवर ९४.६६ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाने अचानक दडी मारल्याने उगवलेली कोवळी पिके कोमेजून करपू लागली आहेत. त्यामुळे या परिसरातील बळीराजावर पुन्हा एकदा दुबार पेरणीचे मोठे संकट उभे ठाकले आहे. मृग नक्षत्र कोरडे गेल्यानंतर परिसरात उशिराने पावसाचे आगमन झाले. त्यामुळे यंदा खरीप पेरणीला विलंब झाला. सुरुवातीला झालेल्या पावसाच्या भरोशावर शेतकऱ्यांनी धाडस दाखवत ९४ टक्के क्षेत्रावर पेरणी उरकून घेतली. मधल्या काळात १५ दिवसांच्या खंडानंतर आलेल्या पावसाने पिकांना तात्पुरता दिलासा दिला; मात्र संपूर्ण परिसरात दमदार पाऊस नाही. निल्लोड मंडळात ९४ टक्के, तर शिवना मंडळात ९६.१५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. निल्लोड, अंबई, शिवना, पालोद व बोरगाव बाजार भागात पेरणी पूर्ण झाली असली, तरी पावसाअभावी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. निल्लोड मंडळात केवळ ९२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जमिनीतील ओल सुकल्याने पिके जमिनीदोस्त होत आहेत. दुबार पेरणीची वेळ आल्यास बियाणे, खते, मशागत व मजुरीचा अतिरिक्त आर्थिक भार शेतकऱ्यांना सहन करावा लागणार आहे. एकसारखा पाऊस न झाल्याने परिस्थिती कठीण बनली आहे. कृषी विभागाच्या १३ जुलैपर्यंतच्या अहवालानुसार परिसरात ९३ हजार ७९७ हेक्टरवर पेरण्या आहे. गव्हाली परिसरात पावसाअभावी खरिपातील पिके सुकून चालली असून, मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. सिल्लोड तालुक्यात महसूल मंडळनिहाय पावसाची स्थिती आणि फटका सिंचनासाठी विहिरींमध्ये पाणीच उपलब्ध नाही मका आणि कपाशीची पिके कशीबशी तग धरून आहेत. परंतु, अजून आठवडाभर पाऊस आला नाही आणि असेच कडक ऊन पडत राहिले, तर पिकांची स्थिती अत्यंत गंभीर होईल. दुबार पेरणीचे संकट आमच्यासमोर उभे ठाकले असल्याचे विनायक शिंदे म्हणाले.
Source link
पिके धोक्यात:गव्हाली परिसरामध्ये पावसाची दडी, एकसारखा पाऊस न झाल्याने खरीप पिकांची वाढ खुंटली