![]()
“विरोधी पक्षात असल्यामुळे निधी मिळत नाही म्हणून आम्ही जनतेची कामे करू शकत नाहीत..!” असा आरोप करत उबाठाच्या ६ खासदारांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केला होता. मात्र त्यांच्या खासदार निधीचे रिपोर्ट कार्ड ‘दिव्य मराठी’ने काढले तर असे निदर्शनास आले की, सर्व ६ खासदारांनी निधी खर्चण्यात हात आखडता घेतला आहे. ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटलांच्या हिशेबात तर भयंकर तफावत आहे. १४.७० कोटींच्या मंजूर निधीपैकी त्यांनी फक्त १५ लाख (१.१ %) खर्च केले. विशेष म्हणजे जनतेचे एकही काम ते पूर्ण करू शकले नाहीत. फुटलेल्या ६ पैकी एकाही खासदाराने २७ टक्क्यांपेक्षा अधिक निधी खर्च केला नाही अशी गंभीर बाब ‘दिव्य मराठी’च्या पडताळणीत उघड झाली आहे. विकास निधीचा अत्यंत संथ वापर केला शिर्डी, यवतमाळ-वाशिम आणि मुंबईच्या खासदारांचा निधी खर्च करण्याची गती खूपच कमी आहे. या तिन्ही मतदारसंघांत पेमेंट गॅपही अधिक प्रमाणात आहे. एकीकडे ग्रामीण भागात लोकांच्या विकासकामांना निधी भेटत नाही, तर दुसरीकडे खासदार कामे प्रस्तावित करत नाहीत असे चित्र आहे. प्रशासकीय दिरंगाई, तांत्रिक अन् प्रशासकीय मंजुरीअभावीदेखील अनेक वेळा निधी अखर्चित राहतो. २ जिल्ह्यांमुळे खर्च दिसेना
संजय देशमुख म्हणाले, ‘माझे २ जिल्हे आहेत. त्यामुळे वाशिम अन् यवतमाळचे डीपीओ स्वतंत्र आहेत. माहिती अपडेट होण्यास वेळ लागतो.’ मोबाइलवर संवाद नाही
भाऊसाहेब वाकचौरेंशी सलग दोन दिवस मोबाइलद्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही. मला नाही, पीएला विचारा
ओमराजेंना फोन केला तर ते म्हणाले, ‘खासदार निधीचे डिटेल माझ्या पीएला माहिती असतात त्यांना विचारा.’ मोबाईलवर संपर्क नाही
मुंबईच्या संजय दिना पाटलांचे ४० पैकी एकही काम पूर्ण झाले नाही. त्यांना मोबाइलवर दोन फोन केले, पण त्यांनी फोन घेतला नाही. ५ कोटी निधी आता मिळाला
हिंगोलीच्या नागेश पाटलांच्या मते,‘मला महिनाभरापूर्वी ५ कोटींचा निधी मिळाला. आधीची कामे मंजूर आहेत. त्याचे पैसे दिले.’ आचारसंहितेने फंड अखर्चित
परभणीच्या संजय जाधवांनी म्हटले की,‘अखर्चित निधी पुढच्या वर्षी वापरतो. माझा निधी आचारसंहितेमुळे खर्च झाला नाही. कामे मंजूर आहे.’ विलीनीकरणाविरुद्ध उद्धवसेना सुप्रीम कोर्टात नवी दिल्ली | उद्धवसेनेच्या ६ बंडखोर खासदारांच्या शिवसेनेत विलीनीकरणास लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी १८ जुलै रोजी मान्यता दिली. त्याला उद्धवसेनेने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. ही सूूचीबद्ध करण्यास न्यायालयाने सहमती दर्शवली आहे. उद्धवसेनेतर्फे झालेल्या युक्तिवादावर सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले, “उद्या काय होईल हे माहीत नाही, पण आम्ही ती सुनावणीसाठी घेऊ.’
Source link
निधीसाठी पक्षांतर केलेल्या उबाठाच्या 6 खासदारांचा 73%निधी अखर्चित:संजय दिना पाटलांनी 2 वर्षांत फक्त 1% निधी खर्च केला, पेमेंट गॅपही 100%