Headlines

बदलापुरात साडी घेऊन न दिल्याले पत्नीने अपंग पतीला संपवले:राग अनावर झाल्याने डोक्यात कुकर घालत आवळला गळा, मुलाच्या एका साक्षीने पत्नीचे कृत्य उघड




साडी खरेदी करून दिली नाही या क्षुल्लक कारणावरून झालेल्या तीव्र वादातून पत्नीने आपल्याच अपंग पतीची कुकर डोक्यात मारून आणि गळा आवळून अत्यंत निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना बदलापूर पूर्व येथील शिरगाव परिसरात घडली आहे. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी आरोपी पत्नीला बेड्या ठोकल्या असून तिच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शिरगाव परिसरात हरेराम सिंग आणि त्यांची पत्नी सुनीता देवी हे वास्तव्यास होते. मंगळवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास साडी खरेदी करण्याच्या मुद्द्यावरून या दाम्पत्यामध्ये वाद झाला. पतीने साडी खरेदी करण्यास नकार दिल्यानंतर सुनीता देवी यांचा राग अनावर झाला. संतापाच्या भरात त्यांनी स्वयंपाकघरातील प्रेशर कुकर थेट हरेराम यांच्या डोक्यात घातला. हरेराम हे अपंग व अंथरुणाला खिळलेले असल्याने त्यांना स्वतःचा बचाव करणे शक्य झाले नाही. त्यानंतर आरोपी महिलेने त्यांचा गळा दाबत खून केला. मुलाच्या साक्षीने फुटले बिंग या घटनेवेळी दाम्पत्याचा 7 वर्षांचा मुलगा घरातच उपस्थित होता. हत्येनंतर आरोपी महिलेने स्वतःचा बचाव करण्यासाठी पोलिसांची दिशाभूल करणारा बनाव रचण्याचा प्रयत्न केला. मात्र, घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी जेव्हा मुलाचा जबाब नोंदवला, तेव्हा या संपूर्ण प्रकरणाचे सत्य समोर आले. चिमुकल्याच्या प्रत्यक्षदर्शी साक्षीनंतर पोलिसांनी आरोपी महिलेची कडक चौकशी केली आणि तिची चलाखी उघडी पडताच तिला तात्काळ अटक केली. कौटुंबिक कलहाचा पोलिसांना संशय या दाम्पत्यामध्ये यापूर्वीही अनेकदा तीव्र वाद होत असल्याचे तपासात पुढे आले आहे. त्यामुळे ही हत्या केवळ साडीच्या क्षुल्लक मागणीवरून झाली आहे की त्यामागे दीर्घकाळापासून चालत आलेला कौटुंबिक कलह, मानसिक छळ किंवा आर्थिक तणाव कारणीभूत आहे, या सर्व संभाव्य कोनांतून बदलापूर पूर्व पोलीस सध्या सखोल तपास करत आहेत. हे ही वृत्त वाचा

नवी मुंबईत गुंडांचा उपद्रव, कोपरखैरणेत शिवसेना शाखेसमोर तरुणावर हल्ला; वाचवायला आलेल्या आईच्या डोक्यात मारला चॉपर
नवी मुंबई शहरातील कोपरखैरणे सेक्टर-19 परिसरात रात्रीच्या सुमारास गुंडगिरीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरासमोर बसण्याला विरोध केल्याच्या किरकोळ कारणावरून दोन तरुणांनी तलवार आणि चॉपरचा धाक दाखवत एका तरुणावर जीवघेणा हल्ला चढवला. इतकेच नव्हे, तर मुलाचा जीव वाचवण्यासाठी आणि वाद मिटवण्यासाठी मध्ये आलेल्या त्याच्या आईलाही आरोपींनी सोडले नाही; तिच्या डोक्यात शस्त्राने वार करून तिला गंभीर जखमी केले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र दहशतीचे वातावरण पसरले असून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.वाचा सविस्तर नवले पूल परिसरातील लॉजवर छापा:9 महिलांची सुटका; 2 जणांना अटक, पुण्यात गुन्हे शाखेची मोठी कारवाई पुण्यातील नवले पूल परिसरातील लॉजमध्ये सुरू असलेल्या देहव्यापाराचा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाने आंबेगाव बुद्रुक येथील दोन लॉजवर कारवाई करत 9 पीडित महिलांची सुटका केली. या प्रकरणी लॉज व्यवस्थापकासह दोघांना अटक करण्यात आली आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *