मुंबईतील चेंबूर येथे स्कूल बसवर झाड पडून झालेल्या 11 वर्षीय विद्यार्थ्याच्या दुर्दैवी मृत्यूप्रकरणी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) चौकशी अहवालात कुणालाही दोषी न धरल्याने संतापाची लाट उसळली आहे. या ‘बेजबाबदार व्यवस्थेचा’ निषेध करण्यासाठी आणि संबंधि
.
नेमके प्रकरण काय होते?
काही दिवसांपूर्वी चेंबूर भागात एका स्कूल बसवर अचानक एक मोठे झाड कोसळून एका 11 वर्षीय निष्पाप विद्यार्थ्याचा करुण अंत झाला होता. यासोबतच, मुंबईत रस्त्यावरून चालताना उघड्या गटारात पडून एका नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटनाही नुकतीच घडली आहे. या वाढत्या दुर्घटनांमुळे मुंबईकरांच्या सुरक्षेचा आणि महापालिकेच्या मान्सूनपूर्व तयारीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
काय कारवाई झाली?
चेंबूरच्या दुर्घटनेनंतर महापालिका आयुक्तांनी एक चौकशी समिती नेमली होती. मात्र, या समितीने नुकत्याच सादर केलेल्या अहवालात पालिकेच्या ‘उद्यान विभाग’ (Garden Department) आणि ‘रस्ते विभाग’ यांना पूर्णपणे निर्दोष (Clean Chit) ठरवले आहे. केवळ एका कंत्राटदाराला दंड ठोठावून प्रशासकीय अधिकाऱ्यांना मोकाट सोडण्यात आले आहे. या अहवालावर मनसेने मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, महापालिका आयुक्तांना जाब विचारण्यासाठी तीन वेळा पत्र देऊनही उत्तर न आल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
आजचे आंदोलन आणि स्वरूप
महापालिकेच्या या ढिसाळ कारभाराला जाब विचारण्यासाठी आज सकाळी 11 वाजता आझाद मैदानात मनसेकडून आंदोलन केले जात आहे. या आंदोलनात अमित ठाकरे यांच्यासह मनसेप्रमुख राज ठाकरे हेदेखील सहभागी होण्याची दाट शक्यता आहे. या आंदोलनासाठी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी अंगावर ‘चला व्यवस्थेला प्रश्न विचारूया’ असा मजकूर छापलेला खास टी-शर्ट परिधान केला आहे. हाच धागा पकडून आज संपूर्ण व्यवस्थेला धारेवर धरले जाणार आहे.
“माणसाचा मृत्यू एवढा स्वस्त झालाय का?”- संदीप देशपांडे यांचा संताप
माध्यमांशी बोलताना संदीप देशपांडे यांनी प्रशासनावर आणि व्यवस्थेवर सडकून टीका केली. ते म्हणाले, “सध्या देशात आणि राज्यात अशी परिस्थिती आहे की कुठलीच व्यवस्था कोणाला जबाबदार नाही. थोडा पाऊस पडला, वारा वाहिला की स्कूल बसवर झाड कोसळते आणि निष्पाप मुलाचा मृत्यू होतो. एक माणूस रस्त्यावर चालता चालता गटारात पडून मरतो, पण चौकशी अहवाल येतो की कोणीही जबाबदार नाही. माणसाचा मृत्यू तुम्ही एवढा स्वस्त करून ठेवला आहे का? पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचा इगो (अहंकार) तर पंतप्रधानांकडूनही मोठा आहे.”
‘नीट’ पेपरफुटी आणि शिक्षणमंत्र्यांवर घणाघात
केवळ मुंबईतील दुर्घटनांवरच नव्हे, तर ‘नीट’ (NEET) परीक्षेच्या पेपरफुटीवरही त्यांनी संताप व्यक्त केला. “नीटचा पेपर फुटतो, 20 मुले आत्महत्या करतात, तिथेही कोणी जबाबदार नाही. विद्यार्थी रस्त्यावर लाठ्या खात आहेत, लोक रोज शिव्या घालत आहेत, तरीही केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान निर्लज्जसारखे खुर्चीवर बसले आहेत. आपल्या घरात मुले चिडली तर आपण त्यांना काठ्यांनी बडवतो का? आपण त्यांच्याशी संवाद साधतो, त्यांचे दुःख जाणून घेतो. सरकारनेही हेच केले पाहिजे. दर रविवारी तुम्ही ‘मन की बात’ सांगता, पण विद्यार्थ्यांची ‘मन की बात’ कधी ऐकणार?” असा थेट सवाल देशपांडे यांनी उपस्थित केला.
हेही वाचा…
माणसाची किंमत इतकी कमी आहे, माहीत नव्हतं:विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज पाहून मराठी अभिनेत्री पूर्वा कौशिक भावुक, व्हिडिओ व्हायरल

‘नीट’ पेपरफुटी प्रकरणावर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टी (CJP)ने दिल्लीत जंतर-मंतरवर सुरू केलेल्या आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांवर झालेल्या पोलिस कारवाईचे पडसाद आता मनोरंजन क्षेत्रातही उमटू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर मराठी अभिनेत्री पूर्वा कौशिक हिने सोशल मीडियावर भावनिक व्हिडीओ शेअर करत विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध नोंदवला आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
विद्यार्थ्यांवर पुन्हा हल्ला केल्यास महाराष्ट्रात फिरू देणार नाही:लाठीचार्जच्या निषेधार्थ मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

नवी दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या घटनेवर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. शांततेत सुरू असलेल्या आंदोलनावर बळाचा वापर करणे अत्यंत क्रूर असल्याचे सांगत, त्यांनी या कारवाईचा निषेध केला आहे. आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील आज थेट दिल्लीतील जंतरमंतरवर जाणार आहेत. येथे वाचा संपूर्ण बातमी