Headlines

पुण्यात अपघात:कात्रज बोगद्याजवळ भरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा दुर्देवी मृत्यू, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल




भरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना जुन्या कात्रज बोगदा परिसरात घडली. या प्रकरणी टेम्पो चालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. लवाजी भारत वाघमारे (वय ४२, रा. बिबवेवाडी) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. या प्रकरणी टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वाघमारे यांचा पुतण्या किरण (वय ३०) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार लवाजी वाघमारे हे जुना कात्रज बोगदा परिसरातून निघाले होते. त्या वेळी नेकलेस पाँईंटजवळ समोरुन येणाऱ्या भरधाव टेम्पोने दुचाकीस्वार वाघमारे यांना धडक दिली. अपघातात वाघमारे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. पोलीस उपनिरीक्षक मारुती वाघमारे पुढील तपास करत आहेत. क्रेनच्या चाकाखाली सापडून महिलेचा मृत्यू क्रेनच्या चाकाखाली सापडून पादचारी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील वाघोली परिसरात घडली. या प्रकरणी क्रेन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत स्वप्नील पांडुरंग शिंदे (वय ३२, रा. हिंदवी पार्क, केसनंद रस्ता, वाघोली) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नील शिंदे यांची पत्नी वाघोली परिसरातून निघाल्या होत्या. त्या वेळी पेट्रोल पंपाजवळ क्रेनने शिंदे यांच्या पत्नीला धडक दिली. क्रेनच्या चाकाखाली सापडून त्यांचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक एन देवगडे पुढील तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *