Headlines

लॉजवर उशीने तोंड दाबून प्रेयसीची हत्या:प्रियकराला ठाणे नगर पोलिसांकडून अटक, हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट




ठाण्यातील एका लॉजमध्ये प्रियकराने प्रेयसीची उशीने तोंड दाबून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी ठाणे नगर पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली असून त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संध्या म्हस्के (वय 23, रा. भांडुप) आणि नंदकिशोर गाडेकर (वय 27, रा. विष्णूनगर, डोंबिवली) यांच्यात गेल्या चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. गुरुवारी ठाणे नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ‘महाराजा हॉटेल लॉज’ येथे हे दोघे आले होते. हॉटेलमधील खोलीत असताना आरोपी नंदकिशोरने उशीच्या साहाय्याने संध्याचे तोंड दाबले. श्वास गुदमरल्याने संध्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हत्येचे कारण अस्पष्ट घटनेची माहिती मिळताच ठाणे नगर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि आरोपी नंदकिशोर गाडेकर याला अटक केली. हत्येमागचे मूळ कारण अद्याप समोर आले नसून ठाणे नगर पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. जालन्यात 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू दुसऱ्या घटनेत, लहान मुले खेळत असताना त्यांच्यात वाद‎ झाला. या वादानंतर दोन गटांत भांडण झाले.‎‎ या भांडणात रॉड,‎‎ तलवारीने एकमेकांना‎‎ मारहाण झाली. यात एका‎‎ तरुणाच्या पोटाजवळील ‎‎बरगडीत तलवार खुपसून‎ ‎हत्या करण्यात आली. या‎‎ मारहाणीत दोन महिला ‎‎गंभीर जखमी झाल्या. ही ‎‎घटना जालना शहरातील ‎वाल्मीकनगर भागात घडली. अहमद रियाज ‎सय्यद (18) असे मृताचे नाव आहे. तन्वी‎ अलीम खान, हुदा अलीम खान अशी गंभीर‎ जखमी झालेल्या महिलांची नावे आहेत. या‎ प्रकरणात दोन संशयितांना ताब्यात घेण्यात‎ आले आहे.‎ किंकाळ्यांनी अर्धा तास ‎परिसर दणाणला‎ मुलांच्या किरकोळ वादातून सुरू‎ झालेला संघर्ष काही क्षणांतच‎ भीषण हाणामारीत बदलला.‎ दोन्ही गटांतील पुरुष, महिलाही ‎रस्त्यावर उतरले. एकच गोंधळ‎ उडाला. काहींच्या हातात ‎लोखंडी रॉड होते. काहींच्या ‎हातात तलवारी होत्या.‎ एकमेकांवर बेछूट हल्ले झाले.‎आरडाओरडा झाला.‎किंकाळ्यांनी सुमारे अर्धा तास‎संपूर्ण परिसर हादरून गेला.‎ रस्त्यावर घडलेल्या या घटनेने‎ नागरिकांमध्ये दहशतीचे ‎वातावरण निर्माण झाले आहे.‎
हे ही वृत्त वाचा एका साडीसाठी बायकोने नवऱ्याला संपवले:7 वर्षांच्या चिमुकल्यासमोरील घटनेने बदलापुरात खळबळ साडी खरेदी करून दिली नाही या क्षुल्लक कारणावरून झालेल्या तीव्र वादातून पत्नीने आपल्याच अपंग पतीची कुकर डोक्यात मारून आणि गळा आवळून अत्यंत निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना बदलापूर पूर्व येथील शिरगाव परिसरात घडली आहे. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी आरोपी पत्नीला बेड्या ठोकल्या असून तिच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. वाचा सविस्तर
हे ही वृत्त वाचा नवी मुंबईत गुंडांचा उपद्रव, कोपरखैरणेत शिवसेना शाखेसमोर तरुणावर हल्ला; वाचवायला आलेल्या आईच्या डोक्यात मारला चॉपर
नवी मुंबई शहरातील कोपरखैरणे सेक्टर-19 परिसरात रात्रीच्या सुमारास गुंडगिरीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरासमोर बसण्याला विरोध केल्याच्या किरकोळ कारणावरून दोन तरुणांनी तलवार आणि चॉपरचा धाक दाखवत एका तरुणावर जीवघेणा हल्ला चढवला. इतकेच नव्हे, तर मुलाचा जीव वाचवण्यासाठी आणि वाद मिटवण्यासाठी मध्ये आलेल्या त्याच्या आईलाही आरोपींनी सोडले नाही; तिच्या डोक्यात शस्त्राने वार करून तिला गंभीर जखमी केले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र दहशतीचे वातावरण पसरले असून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.वाचा सविस्तर नवले पूल परिसरातील लॉजवर छापा:9 महिलांची सुटका; 2 जणांना अटक, पुण्यात गुन्हे शाखेची मोठी कारवाई पुण्यातील नवले पूल परिसरातील लॉजमध्ये सुरू असलेल्या देहव्यापाराचा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाने आंबेगाव बुद्रुक येथील दोन लॉजवर कारवाई करत 9 पीडित महिलांची सुटका केली. या प्रकरणी लॉज व्यवस्थापकासह दोघांना अटक करण्यात आली आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *