Headlines

उमरडच्या शिबिरात 800 प्रमाणपत्रांचे वाटप:महसूल विभागाच्या समाधान शिबिरामध्ये अनेक प्रलंबित दाखल्यांचा निपटारा‎




वाशिंबे करमाळा तालुक्यातील उमरड येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत आयोजित ‘समाधान शिबिर’ मोठ्या उत्साहात पार पडले. या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना आपली रेंगाळलेली प्रशासकीय कामे एकाच ठिकाणी पूर्ण करण्याची संधी मिळाली. तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन केले. प्राथमिक शाळेच्या प्रांगणात आयोजित या शिबिराप्रसंगी आदिनाथ कारखान्याचे माजी चेअरमन वामन बदे, आदिनाथचे संचालक राजाभाऊ कदम, मकाई कारखान्याचे संचालक बापूराव चोरमले, उमरडचे सरपंच प्रमोद बदे, अंजनडोहचे अरुण शेळके, माजी सरपंच संदीप मारकड यांसह विविध विभागांचे प्रमुख व मान्यवर उपस्थित होते. विविध विभाग प्रमुखांनी शासनाच्या योजनांची आणि उपक्रमांची माहिती उमरड मंडळातील नागरिकांना दिली. या संपूर्ण शिबिराचे नियोजन महसूल विभागामार्फत करण्यात आले होते. महसूल विभागाने उत्पन्न दाखले, जात अधिवास, नॉन क्रिमीलेअर, अल्पभूधारक असल्याचे दाखले, सातबारा उतारे, फेरफार नोंदी आणि रेशन कार्ड संबंधीची कामे जागेवरच निकाली काढून नागरिकांना दिलासा दिला. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी महसूल विभागाचे सर्व कर्मचारी आणि उमरड मंडळातील युवा वर्गाने मोलाचे सहकार्य केले. एकाच दिवशी इतक्या मोठ्या संख्येने नागरिकांची कामे मार्गी लागल्याने उमरड परिसरात समाधान व्यक्त होत आहे. आधार कार्डदुरुस्तीची ६०, गॅस संदर्भातील २५ प्रकरणे उमरड महसूल मंडळ २४९, पुरवठा विभाग १७०, आरोग्य विभाग ११६, कृषी विभाग ६३, पंचायत समिती व जि. प. विभाग ६२, आधार कार्ड दुरुस्ती विभाग ६०, एनसीएमसी कार्ड ५२, सेतू विभाग ५०, गॅस विभाग २५, भूमी अभिलेख ११. या प्रमाणे दााखल्यांचे वाटप करण्यात आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *