![]()
भातकुली तालुक्यासाठीची अमरावतीत असलेली पंचायत समिती कार्यालयाची इमारत लवकरच आपला साज बदलणार आहे. या इमारतीचे बांधकाम फार जुने झाले असल्याने ती मोडकळीस आली आहे. सध्या गळकी इमारत म्हणून तिचा उल्लेख केला जात असून, पाणी गळण्याचा अनुभव सीईओ सत्यम गांधी यांनाही आला आहे. त्यामुळे इमारत बदलण्याच्या कामाला अधिक गती आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या कार्यालयाला भेट देऊन कार्यालयीन कामकाज, उपलब्ध भौतिक सुविधा, विविध विभागांच्या कार्यप्रणालीची पाहणी केली. यावेळी त्यांना स्वत:च हा अनुभव आला. गटविकास अधिकारी श्रीमती तृप्ती दुरुगकर व इतर अधिकारीही या भेटीदरम्यान उपस्थित होते. पंचायत समितीची इमारत जुनी व जीर्ण अवस्थेत असून अनेक ठिकाणी छत नादुरुस्त झाल्याने पावसाळ्यात गळती होत असल्याची माहिती बीडीओंनी दिली. दरम्यान स्वत:च आखो देखा हाल अनुभवल्याने सीईओंनीही नव्या इमारतीसाठीचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले. पाहणीदरम्यान त्यांनी काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुरक्षित व सोयीस्कर वातावरणात काम करता यावे, यासाठी आवश्यक असल्यास तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी जागेवर बसण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी प्रवीण वानखेडे, गटशिक्षणाधिकारी प्रेरक उजागरे, सहाय्यक प्रशासन अधिकारी संजय राठी, हेमंतकुमार यावले, सतीश माळवे, ममता वजीर, नारायण चुकांबे उपस्थित होते. असा मागवला प्रस्ताव पंचायत समितीची कार्यालयीन जागा, इमारतीची दुरुस्ती, आवश्यक भौतिक सुविधा व अधिकारी-कर्मचाऱ्यांच ्या बसण्याच्या जागा विस्कळीत झाल्या आहे. त्यामुळे त्यासंबंधीचा सविस्तर आणि वस्तुनिष्ठ प्रस्ताव तातडीने तयार करून जिल्हा परिषदेकडे सादर करावा, असे निर्देश गटविकास अधिकारी श्रीमती तृप्ती दुरुगकर यांना सीईओ गांधी यांनी दिले आहेत.
Source link
भातकुली पंचायत समितीला मिळणार दुसरे दालन:गळतीयुक्त इमारतीचा सीइओंनाही आला अनुभव, नव्या इमारतीसाठीचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश