![]()
जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या पावसाची आकडेवारीनुसार, जिल्ह्यात आतापर्यंत अपेक्षित सरासरीच्या ७२.९ टक्के पावसाची नोंद झाली आहे. २५ जुलैपर्यंत जिल्ह्यात ३१६.९ मिमी पावसाची अपेक्षा असताना प्रत्यक्ष २३०.९ मिमी पाऊस झाला आहे. अहवालाच्या दिवशी (२५ जुलै) जिल्ह्यात सरासरी ३.५ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील सातही तालुक्यांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास तेल्हारा आणि अकोला या दोन तालुक्यांमध्ये मोठा विरोधाभास दिसून येत आहे. तेल्हारा तालुक्यावर वरुणराजाची सर्वाधिक कृपादृष्टी झाली असून, तिथे आतापर्यंत ३१५.९ मिमी म्हणजेच अपेक्षित सरासरीच्या तब्बल १०७.२ टक्के पाऊस झाला आहे. अकोला तालुक्यात पावसाचे प्रमाण सर्वात कमी असून, तिथे केवळ १८१.९ मिमी पाऊस पडला आहे. हे प्रमाण अपेक्षित सरासरीच्या अवघे ५८.१ टक्के इतकेच आहे. जून ते सप्टेंबरमध्ये जिल्ह्यासाठी ६९३.७ मिमी इतके सामान्य पर्जन्यमान अपेक्षित असते. हंगामातील अपेक्षित पावसापैकी ३३.३ टक्के पाऊस पूर्ण झाला आहे. अमरावती विभागाचा विचार करता, विभागात आजपर्यंत अपेक्षित सरासरीच्या ७६.६ टक्के म्हणजेच २६१.० मिमी पाऊस पडला आहे. इतर तालुक्यांचा विचार केल्यास अकोट आणि मूर्तिजापूर तालुक्यांमध्ये पावसाची स्थिती बऱ्यापैकी समाधानकारक आहे. {अकोट तालुक्यात आतापर्यंत २७६.६ मिमी (९०.८%) { मूर्तिजापूर तालुक्यात २६९.३ मिमी (८२.२%) पाऊस झाला आहे. {बार्शीटाकळी (२१३.४ मिमी – ६५.४%), पातूर (२२३.७ मिमी – ६०.०%) {बाळापूर (१६८.६ मिमी – ६०.१%) या तालुक्यांमध्ये अजूनही अपेक्षित पावसाची कमतरता भासत आहे. तालुका मिमी टक्के अकोट २७६.६ ९०.८ मूर्तिजापूर २६९.३ मि ८२.२ बार्शीटाकळी २१३.४ ६५.४ बाळापूर १६८.६ ६०.१ पातूर २२३.७ ६०.० तालुकानिहाय पाऊस
Source link
तेल्हाऱ्यात पाऊस तर अकोला तहानलेलाच:आतापर्यंत 316 मिमीची अपेक्षा; प्रत्यक्षात 230 मिमी पाऊस