Headlines

भाविकांची मांदियाळी:विठू नामाच्या गजराने दुमदुमली‎राजेश्वर नगरी; भाविकांची गर्दी‎, टाळ मृदंगाच्या गजरात आषाढी एकादशी उत्साहात




एकिकडे पंढरीरायाच्या भेटीसाठी वैष्णवांचा थवा पंढरपूरात पोहोचला असतानाच दुसरीकडे राजेश्वर नगरीतही शनिवारी आषाढी एकादशीनिमित्त राजेश्वरी नगरी विठू नामाच्या गजराने दुमदुमली. विठ्ठल मंदिरांमध्ये ६ क्विंटल पेक्षा जास्त प्रसादरुपी साबुदाणा खिचडीचे व तीन हजारांपेक्षा जास्त केळीचे वितरण करण्यात आले. विविध मंदिरांमध्ये िवद्युत रोषणाई करण्यात आली. महापूजेनंतर विठ्ठू माऊलीच्या दर्शनासाठी भक्तांचा सागर लोटला. दरम्यान जुने शहरातील ३२२ वर्ष पुरातन श्री विठ्ठल मंदिर येथे गत ९३ वर्षांपासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. आषाढ शुद्ध एकादशी म्हणजेच आषाढी एकादशीच्या दिवशी मंदिरात पहाटे ५ वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी यांची षोडशोपचारे अभिषेक व महापूजा मंडळाचे सर्वसेवाधिकारी कृष्णा गोवर्धन शर्मा, अर्चना शर्मा यांचे हस्ते पार पडली. जुने शहरातील िवठ्ठल मंदिरात १९३३ पासून अखंड हरिनाम सप्ताहसह इतरही धार्मिक कार्यक्रम, उत्सवांचे आयोजन करण्यात येते. ३२२ वर्ष पुरातन श्री विठ्ठल मंदिर येथे आषाढीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह २२ जुलैपासून सुरू आहे. अखंड हरिनाम सप्ताहाचे यंदा ९३ वे वर्ष आहे. रोज टाळ मृदंगाच्या गजरात सुरू झालेल्या या सप्ताहात भक्त पंढरीनाथाचा जयघोष करीत माऊलीच्या भक्तीत तल्लीन होत आहेत. सप्ताहमध्ये रोज सकाळी ६ वाजतापासून ३५ पेक्षा जास्त भजन मंडळे सेवा देत आहेत. तसेच प्रहारातही भजन मंडळं सहभाग नोंदवत आहे. सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी विविध समित्यांचे गठण करण्यात आले आहे. दरम्यान आषाढी एकादशीनिमित्त पहाटेपासूनच विविध कार्यक्रम पाड पडले. सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी सर्व पदाधिकारी-सभासद परिश्रम घेत असल्याचे व्यवस्थापक रमेश अलकरी यांनी कळवले आहे. आषाढीला पहाटेपासूनच पोलिसांचा बंदोबस्त : आषाढीला पहाटेपासूनच दिवसभर मंदिरामध्ये विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी व लाडक्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती. विठ्ठल मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते. मंदिर व्यवस्थापन व मंडळाचे कार्यकर्ते, पोलिस विभागातर्फ चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता. वीर हनुमान चौकाकडून श्रीवास्तव चौकाकडे जाणारी वाहतूक अन्य मार्गांनी वळवण्यात आली होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *