Headlines

भगवंत प्राप्तीसाठी नामस्मरण सर्वात श्रेष्ठ- चव्हाण महाराज:जळकोट येथे हासुरे मित्रमंडळातर्फे आषाढीनिमित्त प्रवचन‎




जळकोट येथील भीमाशंकर हासुरे मित्रमंडळाच्यावतीने आषाढी एकादशीनिमित्त चव्हाणवाडी येथील हभप. शिवाजी चव्हाण महाराज यांच्या प्रवचन झाले.त्याचबरोबर वारकरी व नागरिकांना फराळ वाटप करण्यात आले. जळकोट येथे झालेल्या कार्यक्रमात प्रथम श्री विठ्ठल – रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर तंटामुक्त अध्यक्ष यशवंत पाटील, माजी पंचायत समिती सदस्य अर्जुन कदम, सामाजिक कार्यकर्ते बबन मोरे यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी बोलताना भीमाशंकर हासुरे म्हणाले, आषाढी एकादशी हा वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा सण आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पंढरपूर येथील विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी जमतात. तसेच आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराजांची व देहू येथून संत तुकाराम महाराजांची पालख्यासह लाखो वारकरी पंढरपूरला पायी चालत येतात. आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाचे सर्वजण दर्शन घेतात. या धार्मिक कार्यक्रमामुळे सर्वांना मनापासून समाधान व आनंद मिळतो. या कार्यक्रमात हभप. शिवाजी चव्हाण महाराज यांनी तुकाराम गाथावर प्रवचन दिले. प्रवचनात त्यांनी सांगितले, बोलावा विठ्ठल.. पहावा विठ्ठल.. करावा विठ्ठल.. जीवभाव या तुकाराम गाथाच्या ओवीवर प्रवचन देताना मानवी जीवनाचे सार्थक कशामध्ये आहे. यावर विवेचन केले. नामस्मरण सर्वात श्रेष्ठ साधन आहे. व्यक्तीमध्ये भगवंत पाहण्याची डोळ्यात असावी. देव भावेचा भुकेला आहे. इंद्रिय जोपर्यंत चांगले आहेत. तोपर्यंत परमार्थ करून घेणे. ती काळाची गरज आहे. भगवंताचे स्मरण करत रहा. श्रीमंती पचवण्यासाठी विनयशीलता लागते. जळकोटनगरी परमार्थाचे अधिष्ठान असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमास उमरगा पंचायत समितीचे माजी सभापती धनराज टिकांबरे,माजी उपसरपंच बसवराज माळगे, माजी सोसायटी चेअरमन विश्वनाथ कारले, सामाजिक कार्यकर्ते माणिक आलुरे, रेवणसिद्ध दरेकर, होर्टीचे शिवशरण पाटील आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाभळगावचे हभप. अशोक जाधव महाराज यांनी मार्गदर्शन केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *