Headlines

पिंपळनेरात संत निळोबारायांच्या समाधी दर्शनासाठी उसळली गर्दी:संत निळोबाराय समाधीचे हजारो भाविकांकडून दर्शन‎




आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर ‘प्रति पंढरपूर’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र पिंपळनेर येथे वारकरी भक्तीचा महापूर आला होता.संत परंपरेतील अखेरचे संत निळोबाराय महाराजांच्या संजीवनी समाधीचे आणि निळोबारायांनी स्थापन केलेल्या स्वयंभू श्री विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी हजारो वारकरी आणि भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली होती. शनिवारी (२५ जुलै) सकाळी संत निळोबारायांचे वंशज बंडू भरत मकाशीर आणि नंदा गोपाळ मकाशीर यांच्या हस्ते संजीवनी समाधीची महापूजा करण्यात आली. यावेळी पुरोहित पयुष गोपाळ मकाशीर आणि अनुज गोविंद कोरडे यांनी वैदिक मंत्रोच्चारात पूजा केली. आषाढी एकादशी निमित्त ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, आमदार काशिनाथ दाते यांनी सपत्नीक पिंपळनेर येथे येऊन निळोबाराय महाराजांच्या संजीवनी समाधीचे दर्शन घेतले.सुमन दाते, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य वसंतराव चेडे,लोक आंदोलन न्यासाचे सचिव दत्ता आवारी, पारनेर नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष दत्ताशेट कुलट, विश्वनाथ चौधरी,देवस्थानचे अध्यक्ष अशोक सावंत, देवस्थानचे विश्वस्त उपस्थित होते. पिंपळनेर ग्रामस्थ,पंचक्रोशीती ल भाविक आणि अन्नदात्यांच्या सहकार्याने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.पिंपळनेर फाटा (राळेगण थेरपाळ) येथेही खासदार निलेश लंके प्रतिष्ठान च्या वतीने भाविकांना खिचडी, केळी आणि चहाचे वाटप करण्यात आले. दिवसेंदिवस वाढणाऱ्या गर्दीमुळे यंदा विक्रमी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. निळोबाराय देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव सावंत यांनी सांगितले की,पूर्वी फक्त एक-दोन क्विंटल खिचडी लागत होती. परंतु यंदा भाविकांच्या गर्दीमुळे ३० क्विंटल साबुदाणा खिचडी आणि केळीचे वाटप करण्यात आले. तसेच आमदार काशिनाथ दाते यांच्या वतीनेा भाविकांसाठी एक टेम्पो भरून केळीचे वाटप करण्यात आले.महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीपांडुरंग आणि संतश्रेष्ठ संत निळोबारायांच्या आशीर्वादाने यावर्षी पिके चांगली यावीत,पर्जन्यमान चांगले रहावे.त्याचबरोबर राज्यातील जनतेला सुख,समृद्धी, आरोग्य लाभावे ही श्रीपांडुरंग चरणी प्रार्थना, असे साकडे आमदार काशिनाथ दाते यांनी घातले. ३० क्विंटल खिचडीचा महाप्रसाद दिवसेंदिवस वाढणाऱ्या गर्दीमुळे यंदा विक्रमी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. निळोबाराय देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव सावंत यांनी सांगितले की,पूर्वी फक्त एक-दोन क्विंटल खिचडी लागत होती. परंतु यंदा भाविकांच्या गर्दीमुळे ३० क्विंटल साबुदाणा खिचडी आणि केळीचे वाटप करण्यात आले. तसेच आमदार काशिनाथ दाते यांच्या वतीनेा भाविकांसाठी एक टेम्पो भरून केळीचे वाटप करण्यात आले. संत निळोबाराय महाराजांवरील श्रद्धा दिवसेंदिवस वाढतेय ^ संत निळोबाराय महाराजांवरील श्रद्धा आणि भक्तिभाव दिवसेंदिवस वाढत आहे. पूर्वी येथे केवळ पत्र्याचे शेड होते. मात्र आज मंदिर परिसरात झालेला विकास पाहून समाधान वाटते. हा बदल भाविकांचे सहकार्य, निळोबाराय देवस्थान ट्रस्टचे नियोजन आणि सेवाभावी कार्य यामुळेच शक्य झाला आहे. -अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *