दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियान हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला आता अत्यंत गंभीर आणि नाट्यमय वळण लागले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) अखेर या प्रकरणात गुन्हा (FIR) दाखल करून सखोल
.
एसआयटीने काहीच केले नाही, पोलीस आयुक्तांनीही प्रतिसाद दिला नाही
सतीश सालियान यांनी गेल्या काही वर्षांत न्यायासाठी केलेल्या संघर्षाचा पाढा वाचताना सांगितले. “सुरुवातीला या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (SIT) गठीत करण्यात आले होते, मात्र त्या एसआयटीने काहीही केले नाही. मी तब्बल दोन वर्षे वाट पाहिली. त्यानंतर आशुतोष सरांच्या मध्यस्थीने मी ॲडव्होकेट नीलेश ओझा यांना भेटलो. आम्ही पहिल्यांदा एफआयआर दाखल करण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात गेलो, परंतु तेथून आम्हाला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.”
न्यायालयात प्रदीर्घ लढा
“त्यानंतर वकिलांच्या सल्ल्यानुसार आम्ही न्यायालयात दाद मागितली. तिथेही तारखांवर तारखा पडत होत्या आणि वेळ निघून जात होता. सुमारे दीड वर्ष असेच गेले. अखेर अडीच दिवस चाललेल्या प्रदीर्घ सुनावणीनंतर न्यायालयाने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश दिले.”
सीबीआयकडे थेट अत्याचार करणाऱ्यांची नावे दिली
दिशा सालियानवर झालेल्या अन्यायाबाबत बोलताना सतीश सालियान यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. सतीश सालियान म्हणाले, “माझ्या मुलीवर ज्यांनी अत्याचार केला, त्या सर्वांची नावे मी तपास अधिकाऱ्यांना दिली आहेत. घटनेचा संपूर्ण तपशील आणि माहिती मी माझ्या जबाबात सीबीआयला दिली आहे.”
बड्या व्यक्तींचा समावेश
“मी सीबीआयला दिलेल्या यादीत आदित्य ठाकरे, डिनो मोरिया, सूरज पांचोली आणि त्यांच्या अंगरक्षकांची नावे दिली आहेत. या गुन्ह्याला पाठीशी घालणे आणि प्रकरण दडपण्यामध्ये (Cover-up) तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग, रिया चक्रवर्ती, सचिन वाझे आणि इतरांचा सहभाग होता, अशी सर्व माहिती मी कागदपत्रांसह तपास यंत्रणेच्या स्वाधीन केली आहे,” असा खळबळजनक दावा त्यांनी केला.
सत्याचाच विजय होईल; अखेर न्यायाची दारे उघडली
सतीश सालियान यांनी सीबीआयच्या तपासावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. ते म्हणाले, “सीबीआयने गुन्हा दाखल करून तपास सुरू करणे हे आमच्या लढ्यातील सर्वात मोठे यश आहे. आता न्यायाचे दरवाजे उघडले आहेत. मला पूर्ण खात्री आहे की उशिरा का होईना, आम्हाला नक्की न्याय मिळेल. आम्ही गेली ६ वर्षे या दिवसाची वाट पाहत होतो, देवाने अखेर आमची हाक ऐकली आहे.” दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात नव्याने तपास करण्याचे निर्देश दिल्यानंतर सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय आणि सिनेसृष्टीच्या वर्तुळात प्रचंड मोठी खळबळ उडाली आहे.
आता सीबीआयच्या तपासाकडे लक्ष
दिशा सालियान यांच्या मृत्यूनंतर या प्रकरणाबाबत अनेक दावे, आरोप आणि राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले आहेत. मात्र, आता न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने एफआयआर नोंदवल्याने या प्रकरणाला कायदेशीर तपासाची दिशा मिळाली आहे. सीबीआय आता सतीश सालियान यांनी दिलेला जबाब, त्यांनी नमूद केलेली नावे, उपलब्ध कागदपत्रे, आधी झालेला तपास आणि इतर संबंधित पुरावे तपासणार आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपांमध्ये तथ्य आहे का, मृत्यूच्या परिस्थितीबाबत नेमके काय घडले आणि यामध्ये कोणाची भूमिका होती का, हे तपासातून स्पष्ट होण्याची शक्यता आहे. सहा वर्षांपासून न्यायासाठी लढा देणाऱ्या सतीश सालियान यांनी मात्र सीबीआयकडे तपास गेल्यानंतर आशावादी भूमिका घेतली आहे. आता तपास सुरू झाला असून, सत्य समोर येईल आणि अखेर दिशाला न्याय मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा…
दिशा सालियान प्रकरणात ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ होईल: बावनकुळेंचा विश्वास, समान नागरी कायद्यावरून विरोधकांवर साधला निशाणा

राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिशा सालियान प्रकरण, समान नागरी कायदा (UCC) आणि राज्यातील दुष्काळ या मुद्द्यांवर सरकारची भूमिका स्पष्ट केली. “दिशा सालियान प्रकरणात सीबीआय चौकशीतून ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ होईल,” असा विश्वास व्यक्त करतानाच त्यांनी समान नागरी कायद्यावरून विरोधकांवर सडकून टीका केली. तसेच, राज्यातील १८ दुष्काळग्रस्त जिल्ह्यांचा अहवाल आज कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांना सादर करणार असल्याची महत्त्वपूर्ण माहितीही त्यांनी दिली. येथे वाचा संपूर्ण बातमी
संजय राऊतांचा सरकारवर घणाघात: म्हणाले- दिशा सालियानची फाईल ओपन करणं, हा तर जरांगेंच्या आंदोलनावरून लक्ष वळवण्याचा डाव

दिशा सालियन प्रकरणातील एफआयआर, मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतेच महाराष्ट्राबाबत केलेले विधान, या तिन्ही मुद्द्यांवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. दिशा सालियन प्रकरणाचा तपास आणि बातम्या या पूर्णपणे ‘मॅनेज’ असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
दिशा सालियान किंवा आदित्य ठाकरेंना कधी भेटलोच नाही!: CBI चौकशीच्या पार्श्वभूमीवर अभिनेता सूरज पांचोलीचा मोठा खुलासा

दिवंगत दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची सूत्रे सीबीआयकडे (CBI) गेल्यानंतर या प्रकरणाला पुन्हा एकदा नवे वळण मिळाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सीबीआयने दाखल केलेल्या प्राथमिक चौकशीत बॉलिवूड आणि राजकीय क्षेत्रातील नावांची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. या प्रकरणात वारंवार नाव ओढले जात असल्याने बॉलिवूड अभिनेता सूरज पांचोली याने अखेर मौन सोडले असून, सोशल मीडियावर एक सविस्तर पोस्ट लिहीत शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि दिशा सालियान यांच्याविषयी अत्यंत मोठा आणि थेट खुलासा केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी