Headlines

महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीच्या वावड्या मुख्यमंत्र्यांनी फेटाळल्या:केंद्रात शिक्षणमंत्रिपदी वर्णी, विराेधकांचा दावा




केंद्रात मंत्री होणार असल्याच्या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर पडदा टाकला. “मी आज नागपुरात आहे, संध्याकाळी मुंबईला जाणार आहे. मी मुंबईतच आणि महाराष्ट्रातच राहणार आहे”, असे स्पष्ट करत त्यांनी दिल्लीत जाण्याच्या अफवा फेटाळून लावल्या. सीजेपी आंदोलनामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धमेंद्र प्रधान पायउतार झाल्यानंतर त्या पदावर फडणवीस यांची वर्णी लागू शकते, अशी चर्चा त्यांच्या दिल्लीवारीने रंगली होती. विरोधकांना आनंद साजरा करायला कारण मिळाले विरोधकांना सेलिब्रेशन करायला काहीतरी कारण मिळाले, याचा मला आनंद आहे, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधुंना लगावला. त्यांच्या डायलॉगबाजीचा कुणावरही परिणाम होत नाही, कारण संपूर्ण देश पंतप्रधान मोदींच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असेही ते म्हणाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *