![]()
तरुणांच्या दोन गटात मागील ४ दिवसांपासून वाद सुरू होता. या वादात माजी नगरसेवकाने मध्यस्थी केली. तरीही तरुणाला भेटायला बोलावत त्याची हत्या केली. ही घटना रविवारी (२६ जुलै) मध्यरात्री १२.४५ वाजेच्या सुमारास रोजाबाग परिसरात घडली. यात नासेर खान तारेख अहेमद
.
घटनेची माहिती मिळताच सहायक आयुक्त सागर देशमुख, निरीक्षक निर्मला परदेशी, रवींद्र सांगळेंनी घटनास्थळी भेट दिली. तर उपनिरीक्षक संजय राठोड, सहायक फौजदार मुनीर पठाण, इप्पर, मंगेश पंडित, ठाकूर यांच्या पथकाने ७ आरोपींना अटक केली. परंतु कोर्टाने अटक बेकायदेशीर अटक ठरत सुटका केली.त्यानंतर पोलिसांनी आरोपींना पुन्हा ताब्यात घेतले. आर याचा तपास पीआय रवींद्र सांगळे करत आहेत.
असा आहे हत्येपर्यंतचा घटनाक्रम
- २ जुलै : रोशन गेट परिसरातील हॉटेलबाहेर आरोपी यासीन याने माझ्या गाडीवर हात ठेवून का उभा राहिला? असे म्हणत फिर्यादी आमेर खानला शिवीगाळ, मारहाण केली.
- रात्री ११ वाजता : आमेर खानचा वाढदिवस असल्याने रात्री ११ वाजता पंचायत समितीजवळ उभे होते. यासीन आणि अशरफ यांनी जुने वाद काढत हाणामारी केली. मृत नासेरने जाब विचारल्याने त्याला मारहाण केली.
- २३ जुलै : अशरफचे वडील आणि कटकट गेटचे माजी नगरसेवक अज्जू पहेलवान यांनी मध्यस्थी करत “तुम्ही दोघे मित्र आहात, वाद मिटवून टाका, पुढे भांडणे करू नका आणि पोलिस ठाण्यात जाऊ नका,’ अशी समजूत काढली.
- २५ जुलै: रात्री ९.३० वाजता : चंपा चौक परिसरात आरोपी शेख कदीर ऊर्फ अमिज ऊर्फ मायाँ आणि शाहीद चारनियाँ यांनी पुन्हा आमेर खान यांच्याशी वाद घातला. रात्री १२ च्या सुमारास शाहीदने आमेरला फोन करून आझाद कॉलेज किंवा रोजाबाग येथे ये, आपण वाद मिटवून टाकू,’ असे सांगितले.
रात्री १२.३५ वाजता आमेर यांचा लहान भाऊ नासेर हा त्याचे मित्र अदील आणि मुझफ्फर यांच्यासोबत शाहीदच्या रोजाबाग येथील घरासमोर पोहोचला. तेथे सर्व आरोपी होते. तेथे पोहोचताच कारमध्ये दबा धरून बसलेल्यांनी हल्ला केला. नासेरने मित्रासह पळ काढल्यावर त्याला मारहाण करत हत्या केली. दोन तास आधी नोटीस दिली नाही
कोर्टाच्या आदेशाने आरोपींना बाहेर आणले अन् पुन्हा घेतले ताब्यात
आरोपींना कोर्टात हजर करण्यापूर्वी २ तासाआधी नोटीस देणे बंधनकारक आहे. त्यांना ५.३० वा. नोटीस देऊन ६.५० वा. हजर केले. त्यामुळे अटक बेकायदा ठरत असल्याचे वकिलांनी मांडले. न्यायालयाने त्यांची सुटका केली. पोलिसांनी त्यांना सोडत बाहेर आणले व व्हिडिओ करत पुन्हा अटक केले. ॲड. नीलेश घाणेकर, अॅड. कुलदीप कहाळेकर यांनी आरोपींची बाजू मांडली.
शनिवारी जामिनावर सुटला; रविवारी हत्या
गुन्ह्यातील आरोपी शेख कदीर ऊर्फ मायाँ याला सिटी चौक पोलिसांनी शनिवारीच आझाद कॉलेज परिसरात शस्त्राचा धाक दाखवून दहशत माजवीत असताना अटक केली होती. तो लगेच जामिनावर सुटला आणि रात्री नासेरची हत्या केल्याचे समोर आले आहे.