![]()
आदिवासी भागातील मोठी ग्रामपंचायत असूनही तालुक्यातील बोराडी येथे विकासकामांचे उत्तम नियोजन, प्रभावी अंमलबजावणी आणि लोकसहभागाच्या बळावर विविध उपक्रम यशस्वीपणे राबवले जात आहेत. लोकवर्गणीतून उभारण्यात आलेले मंदिर असो वा ग्रामस्थांच्या सहभागातून साकारलेले विकास उपक्रम, या सर्वांमधून गावाची एकजूट आणि विकासाची सकारात्मक दिशा स्पष्टपणे दिसून येते, असे गौरवोद्गार विभागस्तरीय मूल्यमापन समितीच्या अध्यक्षा तथा नागपूर अपर आयुक्त (विकास) वर्षा गौरकर यांनी काढले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानां’तर्गत विभागस्तरीय मूल्यमापन समितीने बोराडी (ता. शिरपूर) ग्रामपंचायतीस भेट देऊन विविध विकासकामांचे प्रत्यक्ष निरीक्षण केले. समितीने गावात राबवण्यात आलेल्या स्वच्छता अभियान, पाणीपुरवठा, जलसंवर्धन, हरित उपक्रम, डिजिटल सेवा, शिक्षण, आरोग्य सुविधा, दिवाळी हॉस्पिटल, आयुर्वेदिक पंचकर्म उपचार विभाग आणि इतर लोककल्याणकारी योजनांची बारकाईने पाहणी केली. ग्रामपंचायतीच्या वतीने अभियानांतर्गत राबवलेल्या उपक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. या अधिकाऱ्यांची होती उपस्थिती याप्रसंगी बोराडीचे सरपंच सुकदेव मालचे, उपसरपंच राहुल रंधे, गटविकास अधिकारी प्रदीप पवार, विस्तार अधिकारी प्रकाश महाले, संजय पवार, जितेंद्र पावरा, ग्रामपंचायत अधिकारी मनोज कुमावत, ज्ञानेश्वर तिरमले, महेश वाडिले, विकास पाटील, नीलेश पाटील, कृषी सहायक हिरालाल अहिरे, शिक्षण अधिकारी विठ्ठल घुगे, सुनील बैसाणे, अभियंता आशिष पाटील, रितेश पाटील, राजेंद्र साळुंके उपस्थित होते.
Source link
लोकसहभाग अन् नियोजनातून बोराडीने साधला आदर्श विकास:नागपूर अपर आयुक्त वर्षा गौरकर यांच्याकडून कामांचे कौतुक