![]()
कन्नड तालुक्यातील नागापूर येथे आमदार संजना जाधव यांच्या हस्ते शुक्रवारी सुमारे ६० लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. यामध्ये जिल्हा परिषद अंतर्गत पंचायत पायाभूत सुविधा योजनेतून जिल्हा परिषद शाळेसाठी २५ लाख रुपयांच्या निधीतून दोन नवीन वर्गखोल्या, वसंतराव नाईक तांडा योजनेअंतर्गत १० लाख रुपयांच्या रस्त्याचे काम, तसेच संत सावता माळी समाज सभामंडपासाठी २५ लाख रुपयांचा निधी अशा विविध विकासकामांचा समावेश आहे. यावेळी आमदार संजना जाधव यांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने शाल, पुष्पहार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा कन्नड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मनोज राठोड, पंचायत समिती सदस्या कमलबाई निकम, ज्ञानेश्वर निकम, जयेश बोरसे, रामेश्वर घनकर, शरद जाधव, वाल्मीक वाघ, युवा सेना तालुकाप्रमुख रवी जाधव, करंजखेडा सर्कल प्रमुख गणेश सोळुंके, जिरेमाळी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष अनिल माळी, सरपंच सुरेखा तायडे, माजी सरपंच जगन्नाथ माळी, रोहिदास सोळुंके, डॉ. योगेश तायडे, लखन जाधव, सतीश गौर, सलीम शेख, महेमूद शेख, जावेद शेख, वाल्मीक निर्मळ यांच्यासह ग्रामस्थ व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांसाठी बससेवा सुरू करण्याची मागणी कार्यक्रमादरम्यान ग्रामस्थांनी अंतूर किल्ला रस्ता दुरुस्ती तसेच विद्यार्थ्यांसाठी बससेवा सुरू करण्याबाबतचे निवेदन आमदार जाधव यांना सादर केले. विकासकामांसाठी आवश्यक पाठपुरावा करून नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
Source link
जि. प. शाळेच्या वर्गखोल्या, रस्ता, सभामंडपाचा प्रश्न मार्गी लागणार:आमदार जाधव यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन