Headlines

MPSC Denies Drug Inspector Exam Paper Leak; Files Police Complaint



देशभरात ‘नीट’ पेपरफुटीचे प्रकरण ताजे असतानाच, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 22 मार्च 2026 रोजी घेण्यात आलेल्या ‘औषध निरीक्षक’ भरती प्रक्रियेचा पेपर फुटल्याच्या आरोपांमुळे मोठी खळबळ उडाली होती. मात्र, या प्रकरणाला आता नवीन वळण लागले असून, एका तक्रारद

.

पेपरफुटीच्या आरोपांनंतर आयोगाने तक्रारदाराकडे पुराव्यांची मागणी केली होती, ज्यावर काही डिजिटल पुरावेही सादर करण्यात आले होते. या पुराव्यांच्या आधारे आयोगाने 27 जुलै रोजी तक्रारदार आणि कथित गैरप्रकाराचा लाभ मिळालेल्या उमेदवाराला चौकशीसाठी बोलावले होते, मात्र ते दोघेही या चौकशीकडे फिरकले नाहीत.

बनावट तक्रार केल्याचा दावा

याच दरम्यान, आयोगाला आणखी एक ई-मेल प्राप्त झाला असून, त्यामध्ये तक्रारदाराचा मित्र ऋषिकेश गांगर्डे याने केवळ संभ्रम निर्माण करण्यासाठी ही बनावट तक्रार केल्याचा दावा करण्यात आला आहे. या सर्व घडामोडींनंतर, आता एका तक्रारदाराने आपली कोणतीही तक्रार नसल्याचे स्पष्ट करत या प्रकरणातून अधिकृतरीत्या माघार घेतली आहे.

दोषींवर कठोर कारवाई होणार- आयोग

‘औषध निरीक्षक’ भरती प्रक्रियेतील पेपरफुटीच्या आरोपांची एमपीएससीने अत्यंत गांभीर्याने दखल घेतली असून, याप्रकरणी प्राथमिक तपास सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. या प्रकरणातील खरी वस्तुस्थिती समोर आणण्यासोबतच व्हॉट्सॲप चॅट आणि कॉल रेकॉर्ड्ससारख्या डिजिटल पुराव्यांची सखोल फॉरेन्सिक तपासणी करण्यासाठी आयोगाकडून लवकरच पोलिसांत रीतसर तक्रार दाखल करण्यात येणार आहे. तसेच, या चौकशीअंती जे कोणी या गैरप्रकारात दोषी आढळतील, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी ठाम भूमिका आयोगाने मांडली आहे.

या संदर्भातील या देखील बातम्या वाचा

MPSC पेपरफुटी की फेरपरीक्षेचा बनाव?:आधी ई-मेलवरून आरोप, आता तक्रारच बनावट असल्याचा दावा; तक्रारदाराच्या ‘यू-टर्न’वरून रोहित पवारांचा सरकारवर गंभीर आरोप

MPSCच्या औषध निरीक्षक भरती परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या आरोपांना आता नवे वळण मिळाले आहे. भरती प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारी तक्रार करणाऱ्या व्यक्तीनेच ती तक्रार बनावट असल्याचा दावा ई-मेलद्वारे केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सत्यता नेमकी काय, याबाबत चर्चा सुरू झाली असून अंतिम निष्कर्ष चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे. तथापि, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवारांनी आपल्या पोस्टमधून तक्रारदाराच्या खुलाशावर आक्षेप घेतले आहेत. वाचा सविस्तर

स्पर्धा परीक्षांतील पेपरफुटीवरून सुषमा अंधारे यांचे गंभीर आरोप:MPSC आयोगाच्या भूमिकेवर प्रश्न; परीक्षा शुल्कातून कोट्यवधींची उलाढाल; पैशांचे काय होते?

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षांमधील कथित पेपरफुटीच्या घटनांवरून शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य सरकार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एमपीएससी आयोगावर जोरदार निशाणा साधला. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी सुरू असलेला कथित खेळ, परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकतेचा अभाव, परीक्षा शुल्कातून होणारा आर्थिक व्यवहार आणि पेपरफुटीमागील साखळी यावर त्यांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. तसेच, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.