![]()
कृषी, सहकार आणि शिक्षण क्षेत्रातील ज्येष्ठ नेते तथा नाफेडचे माजी अध्यक्ष स्व. चांगदेवराव भागवतराव होळकर यांच्या कृषी, सहकार, शिक्षण आणि शेतकरी हितासाठीच्या आजीवन योगदानाचा गौरव म्हणून त्यांना “कर्मयोगी चांगदेवराव भागवतराव होळकर’ ही उपाधी शासनाने अथवा
.
दि लासलगाव मर्चन्टस् असोसिएशन व बाजार समिती, लासलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि. २७) श्री छत्रपती शिवाजी महाराज नवीन कांदा बाजार आवारातील प्रशासकीय सभागृहात स्व. चांगदेवराव भागवतराव होळकर यांच्या निधनानिमित्त श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले.
नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नंदकुमार डागा यांनी सांगितले की, स्वर्गीय होळकर यांनी पदापेक्षा कार्याला आणि सत्तेपेक्षा सेवेला अधिक महत्त्व दिले. ग्रामपंचायतीपासून नाफेडच्या अध्यक्षपदापर्यंतचा त्यांचा प्रवास प्रामाणिक नेतृत्व, दूरदृष्टी आणि नि:स्वार्थ सेवाभावाचा आदर्श होता. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय्य दर, बाजारपेठेचा विकास, निर्यातवाढ, सहकार चळवळीचे बळकटीकरण आणि ग्रामीण शिक्षणाचा विस्तार यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिल्याचे नमूद केले.
आशियातील सर्वात मोठ्या लासलगाव कांदा बाजारपेठेच्या उभारणी आणि विकासात स्व. होळकर यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिल्याचे वक्त्यांनी सांगितले. नाफेड, एनएचआरडीएफ, वेफको, खरेदी-विक्री संघ, कांदा-बटाटा उत्पादक सहकारी संघ, रानवड सहकारी साखर कारखाना तसेच विविध शैक्षणिक संस्थांमधील त्यांच्या नेतृत्वाचा उपस्थितांनी गौरव केला.
सभेत अखिल भारतीय वाईन उत्पादक महासंघाचे अध्यक्ष जगदीश होळकर, वेफकोचे अध्यक्ष संजय होळकर, दि लासलगाव मर्चन्टस् असोसिएशनचे अध्यक्ष नितीनकुमार जैन, विश्वस्त ओमप्रकाश राका, ॲड. रमेश शिंदे, डॉ. श्रीकांत आवारे, बाजार समिती सचिव नरेंद्र वाढवणे, अफजल शेख, पुरुषोत्तम चोथानी, बाळासाहेब दराडे आदींनीही होळकर यांच्या कार्याचा गौरव केला. सूत्रसंचालन मनोज जैन यांनी केले. यावेळी व्यापारी, शेतकरी, बाजार समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.