![]()
ग्रामीण भागातून वाचन संस्कृती रुजली तरच समाजाचा खरा विकास होईल. अकोले तालुक्यात इंदोरीसारख्या गावातून अशी चळवळ उभी राहणे खरेच आशादायी आहे, असे प्रतिपादन अभिनेते तथा वृक्षदूत सयाजी शिंदे यांनी केले. त्यांनी विजया पाडेकर-ठोंबाडे यांच्या सह्याद्री देवराईच्या संकल्पनेलाही पाठिंबा देत निसर्ग संवर्धनासाठी एकत्र येऊन देवराई उभारण्याचे आवाहन केले. “झाड माणसाला श्वास देते आणि पुस्तक विचार देते” या विचाराला कृतीची जोड देत इंदोरी गावात सोशल नेटवर्किंग फोरमचे जिल्ह्यातील पहिल्याच वाचनालयाचे उद्घाटन झाले. यानिमित्त अभिनेते शिंदे मार्गदर्शन करताना बोलत होते. सामाजिक कार्यकर्ते रवी ठोंबाडे व विजया पाडेकर-ठोंबाडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे स्वप्न साकार झाले, हेही शिंदे यांनी आवर्जून सांगितले. भंडारदरा येथील भेटीत विजया पाडेकर-ठोंबाडे यांनी व्यक्त केलेल्या वाचनालयाच्या कल्पनेला अभिनेते सयाजी शिंदे यांनी प्रतिसाद देत एसएनएफचे संस्थापक प्रमोद गायकवाड यांना पुढाकार घेण्यास सांगितले. त्यातून उर्जा मिळून या वाचनालयाची सुरूवात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे उपस्थित होते. प्रास्ताविक विजया पाडेकर-ठोंबाडे यांनी केले. या प्रसंगी पद्मश्री राहीबाई पोपेरे, जीवन सोनवणे, योगेश डागा उपस्थित होते. पठारे म्हणाले, वाचनातून प्रश्न विचारण्याची ताकद येते व त्यातूनच परिवर्तन घडते. या वाचनालयातून इंदुरीतील अनेक अधिकारी आणि विचारवंत घडतील. केवळ पुस्तकांचे दालन न राहता हे वाचनालय इंदोरीच्या सामाजिक आणि वैचारिक परिवर्तनाचे केंद्र बनेल, असाही विश्वास व्यक्त केला. प्रास्ताविकात विजया पाडेकर-ठोंबाडे यांनी वाचनालय विद्यार्थी, युवक, महिला आणि सर्व ग्रामस्थांसाठी विचारमंथनाचे केंद्र बनवण्याचा निर्धार व्यक्त केला. प्रमोद गायकवाड यांनी नाशिक जिल्ह्यात एसएनएफच्या ३६ हून अधिक वाचनालयांमधून अनेक विद्यार्थी शासकीय सेवेत गेल्याचे सांगून इंदोरीसाठीही महत्त्वपूर्ण पुस्तके उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. वाचनालय सुरू करण्यास इंदोरी ग्रामपंचायत, शाळा, मंदिर ट्रस्ट आणि दानशूरांनी सहकार्य केले. वाचनातून मिळते प्रश्न विचारण्याची ताकद वाचनातून प्रश्न विचारण्याची ताकद येते व त्यातूनच परिवर्तन घडते. या वाचनालयातून इंदुरीतील अनेक अधिकारी आणि विचारवंत घडतील. केवळ पुस्तकांचे दालन न राहता हे वाचनालय इंदोरीच्या सामाजिक आणि वैचारिक परिवर्तनाचे केंद्र बनेल, असाही विश्वास ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी व्यक्त केला.वाचनालय विद्यार्थी, युवक, महिला आणि सर्व ग्रामस्थांसाठी विचारमंथनाचे केंद्र बनवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. या उपक्रमासाठी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Source link
वाचन संस्कृती रुजली तरच समाजाचा खरा विकास होईल:अभिनेते सयाजी शिंदे यांचे प्रतिपादन, इंदोरी येथे वाचनालयाचे केले उद्घाटन