Headlines

मुळा धरणात 16 टीएमसी पाणी; तरी खरिपाचे आवर्तन अधांतरी!:हलक्या सरींमुळे खरीपाच्या पिकांना अंशतः आधार‎




महिनाभरात घाटमाथ्यावर अर्थात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील भंडारदरा व निळवंडे धरण ओव्हर फ्लो झाले आहे. तर मुळा धरणाचा जलसाठा १६ टिएमसी झाला आहे. त्यामुळे धरणांतील उपसा सिंचन सुरू करण्यात आले. परंतू एलनिनो सावटामुळे सप्टेंबरअखेरपर्यंत धरणातील पाणी पिण्यासाठी राखून ठेऊन सिंचन योजनांना ब्रेक लावला आहे. त्यामुळे खरिपात गरज असूनही कालव्यांचे आवर्तन मात्र रखडले आहे. घाटमाथ्यावर पाऊस होत असला तरी लाभक्षेत्रात पाऊस कमी असल्यामुळे विहिरींची पातळी अद्याप वाढलेली नाही. खरिपातील आवर्तन सोडल्यास भूजलसाठा वाढून, रब्बीची शाश्वती वाढेल असा दावा तज्ज्ञांनी केला आहे. एलनिनो इफेक्टमुळे लाभक्षेत्रात अद्याप दमदार पाऊस झाला नाही. हलक्या सरींमुळे खरीप पिकांना अंशतः आधार मिळत असला तरी विहीरींची पाणीपातळी वाढलेली नाही. त्यातच पावसामध्येही खंड पडत आहे. सद्यस्थितीत धरणांमधील जलसाठे पाहता, परीस्थिती बदलली आहे. कालव्यांना पाणी सोडण्यासंदर्भात लाभधारकांकडुन मागणी होत आहे. परंतू, सप्टेंबरअखेरपर्यंत पाणी राखीव असल्याने, धरणांच्या डाव्या व उजव्या कालव्यातून आवर्तन सोडले नाही. सुमारे ७०० शेतकऱ्यांचे उपसा सिंचन सुरू झाल्याने ११५० हेक्टरला दिलासा मिळाला आहे. मुळा धरणाचा जलसाठा ६१ टक्क्यांवर पोहोचला आहे. धरणात सद्यस्थितीत ८ हजार ७५९ क्युसेक वेगाने धरणांत आवक सुरू आहे. भंडारदरा ९१.५८ टक्के तर निळवंडेचा साठा ९०.३२ टक्क्यांवर पोहोचला आहे. अजूनही पावसाचा कालावधी शिल्लक असल्याने, सर्व धरणे भरतील असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवला जात आहे. उत्तमराव निर्मळ, निवृत्त कार्यकारी अभियंता. { नदीपात्रात सुरू असलेला विसर्ग { भिमा नदी – दौंड पूल विसर्ग (सेंन्सर)- ६५०८४ क्युसेक. { घोड नदी – २०००० क्युसेक. { गोदावरी नदी – नांदूर मधमेश्वर धरण विसर्ग – 46,227 क्युसेक. { प्रवरा नदी – भंडारदरा धरण – ८३० क्युसेक. { निळवंडे धरण विसर्ग ७५६० क्युसेक. { ओझर बंधारा विसर्ग – १३००० क्युसेक.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *