![]()
यंदाच्या आषाढी यात्रेच्या काळात दशमी ते द्वादशी या तीन दिवसांच्या काळात पंढरपूरमध्ये तब्बल ३२ लाख वारकरी येऊन गेल्याची नोंद ग्रामीण पोलिसांनी एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने केली आहे. भाविकांची ही मोजणी अचूक असल्याचा दावा ग्रामीण पोलिसांनी केला आहे. नुकतीच यंदाची आषाढी यात्रा संपन्न झाली. यात्रेच्या दरम्यान सोलापूर ग्रामीण पोलिस दलाने सुरक्षेसोबतच गर्दी व्यवस्थापनात अत्याधुनिक तंत्र वापरून चांगली कामगिरी केली आहे. सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून यंदाच्या वारीत सेंटियंट लॉजिक्स’ या तंत्रज्ञान संस्थेच्या मदतीने अत्याधुनिक ‘कॉग्निटिव्ह व्हिज्युअल ह्युमन न्यूरल एआय’ तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर करण्यात आला. या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने दशमी, एकादशी आणि द्वादशी या तीन दिवसांत (२४ ते २६ जुलै) पंढरपुरात दाखल झालेल्या ३१ लाख ९८ हजार १२९ भाविकांची अचूक नोंद करण्यात आल्याचे प्रसिद्धपत्रकात म्हटले आहे . . २४ जुलै (दशमी): ६ लाख ७५ हजार २७४ . २५ जुलै (आषाढी एकादशी): १८ लाख ९७ हजार . २६ जुलै (द्वादशी): ६ लाख २६ हजार २८२ वारकरी . एकूण भाविक: ३१ लाख ९८ हजार १२९ सरगम चौक ते इंदिरा गांधी चौक, तीन रस्ता ते दगडी पूल, गोपाळपूर पूल, सावरकर चौक व मिलिटरी हॉस्टेल आणि सांगोला चौक एन्ट्री या ५ मुख्य मार्गांवर खास एआय कॅमेरे बसवण्यात आले होते. व्यक्तीचा चेहरा, कपड्यांचा रंग आणि टोप्यांचा ताळमेळ लावून प्रत्येक वारकऱ्याची एक ‘युनिक एआय ओळख’ तयार केली जात होती. वारकरी शहरात फिरताना इतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी त्यांना न मोजता एकाच ओळखीने ट्रॅक केले. तसेच शहराबाहेर जाऊन पुन्हा प्रवेश करणाऱ्या भाविकांची जुन्या नोंदीशी पडताळणी करून दुबार मोजणी रोखण्यात आली. पारंपरिक कॅमेरा पद्धतीमध्ये एकच व्यक्ती विविध कॅमेऱ्यांसमोर आल्यास आकडेवारी वाढण्याची शक्यता असते. मात्र, सोलापूर ग्रामीण पोलिसांनी वापरलेल्या एआय प्रणालीने ही दुबार नोंद पूर्णपणे टाळल्याचा दावा पोलिसांच्या तांत्रिक विभागाने केला आहे.भाविकांची मोजणी अचूक असल्याचा पोलिसांनी केला आहे.
Source link
पंढरपुरात तीन दिवसांत 32 लाख वारकरी:एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने केली अचूक नोंद, सेंटियंट लॉजिक्समुळेम्हणे टळली दुबार मोजणी