![]()
प्रेमविवाह केलेल्या मुलीने आईसोबत जाण्यास नकार दिल्याने श्रीरामपूर शहरात सोमवारी हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. संतप्त झालेल्या आईने मुलगा व मुलगी बसलेल्या कारच्या बोनेटवर बसून गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने महिलेसह कार पुढे चालवल्या
.
मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या पालकांनी तालुका पोलिस ठाण्यात दिली होती. मात्र संबंधित तरुणीने राहुरी तालुक्यातील एका तरुणासोबत प्रेमविवाह केल्याचे पुढे स्पष्ट झाले. या प्रकरणातील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दोघे श्रीरामपुरात आले असता मुलीच्या नातेवाईकांचा त्यांच्याशी वाद झाला. मुलीने नातेवाईकांसोबत जाण्यास नकार दिल्यानंतर तिच्या आईने संतापाच्या भरात कारच्या बोनेटवर बसत गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, कार सुरूच राहिल्याने महिला बोनेटवर बसली.