![]()
उजनी धरणातून भीमा नदीपात्रात सोडण्यात आलेला ६१,६०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग उजनीतून सोडण्यात येत आहे. त्यातच वीर धरणातून ५७३७ क्यूसेक विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पंढरपुरात चंद्रभागा दुथडी वाहत आहे. पाण्यातील मंदिरे पाण्यात गेली आहेत. यामुळे नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून, पंढरपुरात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. पाण्याची पातळी वाढल्यामुळे चंद्रभागेवरील जुना दगडी पूल दोन फूट पाण्याखाली गेला आहे. तसेच, नदीच्या वाळवंटात असणाऱ्या सर्व लहान-मोठ्या मंदिरांना पाण्याने वेढा घातला असून, पाणी आता थेट घाटाच्या पायऱ्यांकडे सरकू लागले आहे. आषाढी यात्रेनिमित्त अद्यापही पंढरपुरात लाखो भाविक व वारकरी उपस्थित आहेत. वाढती पाणी पातळी पाहता प्रशासनाने तातडीने उपाययोजना राबवत भाविकांना नदीपात्रात उतरण्यास सक्त मनाई केली आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून चंद्रभागेच्या सर्व घाटांवर पोलिस बंदोबस्त आणि आपत्ती व्यवस्थापन पथके तैनात केली आहेत. भाविकांनी पात्रात न उतरता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे. अकलूज | नीरा खोऱ्यातील चार प्रमुख धरणांत समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. मंगळवारी दुपारी अहवालानुसार या धरणात एकूण ४३.५३ म्हणजे टीएमसी म्हणजे ९०.०८ पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी या दिवशी हा साठा ४४.९३ टीएमसी म्हणजे ९२.९८ टक्के होता. दरम्यान पाणलोटातील पाऊस कमी झाल्याने वीर धरणातील विसर्गातही घट केली आहे. सध्या ५७३७ क्यूसेक विसर्ग सुरू आहे. सध्या भाटघर धरणात २०.१५ टीएमसी म्हणजे ८५.७७ टक्के, नीरा देवघरमध्ये १०.६३८ टीएमसी म्हणजे ९२.३६ टक्के, गुंजवणीत ३.१३७ टीएमसी म्हणजे ८५.०२ टक्के पाणीसाठा झाला असून, वीर धरण १०० टक्के भरले आहे. त्यात ९.४० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. मागील दोन दिवसात पूर्ण क्षमतेने भरलेल्या वीर धरणातून सध्या ५७३७ क्यूसेक विसर्ग सुरू आहे. टेंभुर्णी | उजनी धरण शंभरीत आले असून उजनीच्या पाणीसाठा ११७.११ टीएमसी (९९.७८ टक्के) स्थिर ठेवले असून, दौंडमधून ५५५८७ क्यूसेक तर बंडगार्डन १८२२१ क्यूसेकचा विसर्ग सुरू असल्याने उजनीची धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी उजनीतून सोमवारी ५० हजारने सोडलेल्या विसर्गात मंगळवारी पहाटे १० हजाराने वाढ करून ६० हजार व वीजनिर्मिती तून १६०० क्युसेक असा ६१६०० भीमा नदीत विसर्ग सोडण्यात आला आहे.तर वीर धरणातून ४६३७ क्यूसेक्सने विसर्ग चालू असून, नीरा नरसिंहपूर येथून ६७९४० क्यूसेकने पाणी पंढरपूरच्या दिशेने प्रवाहित होत आहे. मंगळवारी भीमा खोऱ्यात पावसाने विश्रांती घेतली असल्याने उजनी धरण साखळीतील १३ धरणांमधून सोडलेल्या विसर्ग सोडला होता. १० धरणातून पाणी सुरू आहे.
Source link