Headlines

नारळाच्या दरात गतवर्षीपेक्षा 15 रुपये वाढ:गुरुपौर्णिमेनिमित्त आवक वाढली, दिवाळीपर्यंत नारळाची होणार विक्री, 40 रु.दर‎




आषाढ पौर्णिमा अर्थात गुरूपौर्णिमेनिमित्त गुरूला श्रीफळ अर्थात नारळ अर्पण करण्याची परंपरा आहे. हे आरोग्यदायी फळ आहे. त्याचे सेवन शरीरासाठी आवश्यक असून, शरीरातील खनिजं, सोडियम, पोटॅशियमसह इलेक्ट्रोलाईट्सची हे फळ उणीव भरून काढते. त्यामुळे ते बहुउपयोगी फळ असून, याच कारणास्तव मंदिरातील देवापासून ते ज्यांनी गुरू म्हणून उत्तम संस्कार, ज्ञान दिले त्यांनाही आदरभाव व्यक्त करण्यासाठी नारळ अर्पण केले जाते. ते फोडून त्याचा प्रसाद वाटप करण्यासह त्याचे सेवन केले जाते. त्यामुळे सध्या शहरात मोठ्या प्रमाणात ओल्या नारळाला मागणी वाढली असून, शहरात जागोजागी नारळी विक्रीची दुकाने सजली आहेत. विशेष बाब अशी की, आवकही मोठ्या प्रमाणात वाढली असली तरी प्रति नगर नारळाचा दर ४० रु. आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात १० ते १५ रुपयांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी नारळ दर्जानुसार २५ ते ३० रुपयांना मिळत होते. शहरात गुरू पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला चार ते पाच ट्रक नारळाची आवक झाली. कारण, येथूनच संपूर्ण जिल्ह्यात नारळ पाठवले जातात, अशी माहिती विक्रेते अब्दुल गफ्फार यांनी दिली. कोकणासह हैदराबाद येथून शहरात उर्वरित. पान ४ ^नारळ हे इलेक्ट्रोलाईट्स, सोडियम, पोटॅशियमचा खजिना असून, नारळाच्या पाण्यामुळे शरीराला तजेला मिळतो. पाण्याची उणीव भरून निघते. शरीरासाठी नारळ पोषक आहे. त्यामुळे नारळ खाण्याचे फायदेच आहे. ओल्या व सुक्या नारळापासून अनेक खाद्य पदार्थ तयार केले जातात. त्यामुळेही शरीराला पोषण मिळते. -डॉ. उज्वला ढेवळे, आहारतज्ज्ञ, पीडीएमसी. नारळात इलेक्ट्रोलाईट्स, सोडियम, पोटॅशियम



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *