Headlines

कर्तव्यावर असतानाच काळाचा घाला:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे एस्कॉर्ट अधिकारी PSI विजय सांगडे यांचे निधन




राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यात एस्कॉर्ट अधिकारी म्हणून सेवा बजावणारे पोलीस उपनिरीक्षक (PSI) विजय सांगडे यांचे आज दुर्दैवी निधन झाले. वयाच्या 57 व्या वर्षी कर्तव्यावर असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याने पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी नेहमीप्रमाणे ते ठाण्यातील शासकीय विश्रामगृह येथे आपल्या ड्युटीवर हजर झाले होते. काम करत असतानाच अचानक त्यांच्या छातीत तीव्र कळ आली आणि त्यांना चक्कर आली. सहकाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवले; मात्र दुर्दैवाने उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 3 वर्षे बजावली उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात सेवा विजय सांगडे हे मूळचे डोंबिवलीतील पलावा सिटी येथील रहिवासी असून ते कुटुंबासह तेथे राहत होते. गेल्या 3 वर्षांपासून ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एस्कॉर्ट पथकात अत्यंत निष्ठेने आपली जबाबदारी पार पाडत होते. त्यांच्या या अकाली जाण्याने सांगडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शासकीय इतमामात अखेरचा निरोप घटनेची माहिती मिळताच ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रुग्णालय गाठले. ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालय परिसरात अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. ठाणे पोलिसांच्या तुकडीने बंदुकीच्या फेऱ्या झाडून (तोफेची सलामी देऊन) आपल्या या शूर सहकाऱ्याला अंतिम मानवंदना व श्रद्धांजली वाहिली. याप्रसंगी परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील आणि परिमंडळ 5 चे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शासकीय सोपस्कार पार पडल्यानंतर त्यांचे पार्थिव अंतिम संस्कारासाठी त्यांच्या मूळ गावी रवाना करण्यात आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *